कामाख्या मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कामाख्या या पानावरून पुनर्निर्देशित)



कामाख्या मंदिर

नाव: कामाख्या मंदिर
निर्माता: चिलाराय
देवता: कामाख्या देवी
स्थान: नीलांचल पर्वत, गुवाहाटीजवळ, आसाम


कामाख्या मंदिर हे आसामची राजधानी गुवाहाटी (गोहत्ती)येथे आहे. शक्तिदेवता सतीचे हे मंदिर आसामची राजधानी दिसपूर येथून ६ कि.मी. अंतरावर असलेल्या नीलांचल पर्वतश्रेणीत आहे. मंदिर दगडात कोरले आहे. देवीची प्रतिमा आहे. तिथेच देवीची वस्त्रे, आभूषणे, भोग चढविला जातो. एका डोंगरावर असलेल्या या मंदिराचे तांत्रिक शास्त्रात विशेष महत्त्व आहे. हे देवीच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक असून येथील देवी योनी स्वरूपात आहे.

अंबुवाची पर्व[संपादन]

वर्षात एकदाच येणारे अंबुवाची पर्व जगातील सर्व तांत्रिक, मांत्रिक आणि सिद्ध-पुरुषांसाठी वस्तुतः एक वरदान आहे. हे अंबुवाची पर्व भगवती (सती)चे रजस्वला पर्व असते. पौराणिक शास्त्रांनुसार सत्ययुगात हे पर्व १६ वर्षांतून एकदा, द्वापर युगात १२ वर्षांतून एकदा, त्रेता युगात ७ वर्षांतून एकदा तर कलियुगात प्रत्येक वर्षी जून महिन्यात येते. २०१६ साली अंबुवाची योग पर्व २२ॅ २३ॅ २४ या तारखांना पाळले गेले.

शीर्षक[संपादन]

कथा[संपादन]

पौराणिक संदर्भ[संपादन]

पौराणिक आख्यायिकेनुसार अम्बुवाची पर्वाच्या काळात देवी भगवती रजस्वला होते आणि तिच्या गर्भगृहातील योनीतून सलग तीन दिवस जल प्रवाहाच्या ठिकाणाच्या जागी रक्त वाहते (अशी मान्यता आहे)..या कलियुगातील हे एक आश्चर्य मानले जाते.

कामाख्या तंत्रानुसार -

योनिमात्र शरीरिणी कुंजवासिनी कामदा। रजोस्वला महातेजा कामाक्षी ध्येताम् सदा।।

याविषयी राजराजेश्वरी कामाख्या रहस्य या ग्रंथात तसेच दस महाविद्या या हिंदी ग्रंथात कामाख्या देवीचे अनन्य भक्त ज्योतिषी तसेच वास्तुत्ज्न वाच. दिवाकर शर्मा यांनी म्हटले आहे की अम्बुवाची पर्व काळात देवीच्या गर्भगृहाची दारे आपोआप बंद होतात आणि तिचे दर्शनही निषिद्ध होते.या पर्वाच्या निमित्ताने जगभरातील तांत्रिक , मांत्रिक उपासक सिद्धी प्राप्त करण्यासाठी तसेच मंत्रसाधना करण्यासाठी या ठिकाणी एकत्र होतात हे याचे महत्त्व म्हणून नोंदविता येईल. देवीच्या रजस्वला काळाची सांगता तीन दिवसांनी होते आणि त्यानंतर तिची विशेष पूजा आणि साधना केली जाते.

कामाख्या विषयाचे अभ्यासक तसेच प्राच्य विद्या विषयाचे विशेषज्ञ याविषयी म्हणतात-याविषयीची आख्यायिका अशी आहे की- असुरराज नरकासुर अहंकारी होता. भगवती कामाख्येला आपली पत्नी करून घेण्याची त्याची इच्छा होती व त्यासाठी तो आग्रही होता. नरकासुराचा मृत्यू जवळ आला आहे हे ओळखून देवीने त्याला सांगितले की आज एका रात्रीत तू नील पर्वताच्या चारही बाजूना दगडाचे चार रस्ते तयार कर आणि मंदिरासोबत एक विश्राम गृहही तयार कर. तू हे पूर्ण करू शकलास तर मी तुझी पत्नी होईन आणि नाही करू शकलास तर तुझा मृत्यू अटळ आहे. अहंकारी राक्षसाने सकाळ होण्यापूर्वी दगडाच्या पायऱ्यांचे रस्ते तर तयार केले पण विश्रामगृहाचे काम चालू असतानाच देवीने एका मायावी कोंबड्याच्या द्वारे सकाळ झाल्याचे सूचित केले ज्यामुळे रागावलेल्या नरकासुराने त्याचा पाठलाग केला. ब्रह्मपुत्रेच्या दुसऱ्या तीरावर पोचलेल्या असुराने त्या कोंबड्याला मारले. हे ठिकाण आजही कुक्टाचकि नावाने प्रसिद्ध आहे. नंतर देवी भगवतीच्या मायेमुळे विष्णूने नरकासुराचा वध केला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा भगदत्त कामरूपचा राजा झाला. भगदत्तानंतर कामरूप राज्य छोट्या भागात विभागले गेले आणि सामंत राजाचे राज्य सुरू झाले. नरकासुराच्या हीन कार्यामुळे तसेच मुनीच्या अभिशापामुळे देवी प्रकट व्हावे लागले होते.

पं. दिवाकर शर्मा यांनी सांगितले आहे की, आद्य शक्ती भैरवी कामाख्येचे दर्शन घेण्यापूर्वी महाभैरव उमानंडाचे दर्शन घेतात. हे मंदिर गुवाहटी शहराजवळ ब्रह्मपुत्र नदीच्या वरच्या भागात आहे.हे ठिकाण तांत्रिक सिद्धीचे सर्वोच्च सिद्ध शक्तिपीठ आहे. या भागाला मध्यांचल पर्वत या नावानेही ओळखले जाते, कारण या ठिकाणी समाधिस्थितीत असलेल्या शंकराला कामदेवाने बाण मारला होता आणि समाधीतून बाहेर आल्यावर शंकराने त्या कामदेवाला जाळले होते. नीलाचल पर्वतावर कामदेवाला पुनः जीवनदान मिळाले म्हणून या क्षेत्राला कामरूप असेही म्हटले जाते.

सर्वोच्च कौमारी तीर्थ[संपादन]

सती स्वरूप आद्यशक्ती महाभैरवी कामाख्येचे तीर्थ हे जगातील सर्वोच्च कौमारी तीर्थ म्हणूनही ओळखले जाते.त्यामुळे या शक्तिपीठाच्या ठिकाणी कुमारी पूजनाचे अनुष्ठानही महत्त्वाचे मानले जाते.सर्व कुलांतील आणि वर्णांतील कुमारिका या आदिशक्तीचे प्रतीक मानल्या जातात. यामध्ये जातिभेद पाळला जात नाही. असा भेद पाळल्यास साधकाची सिद्धी नाहीशी होते (असे मानले जाते.) शास्त्रात सांगितले आहे की असा भेद केल्याने इंद्र्तुल्य देवालाही आपल्या श्रेष्ठ पदाला मुकावे लागले होते. या स्थळी आदिशक्ती कामाख्या कुमारी रूपात स्थापित आहे असे मानले जाते.

ज्याप्रमाणे उत्तर भारतात कुंभमेळ्याचे विशेष महत्त्व मानले जाते त्याचप्रकारे आदिशक्तीच्या अम्बुवाची पर्वाचे महत्त्व आहे. तंत्र आणि मंत्रशास्त्राचे उपासक या काळात मंत्रांचे पुरश्चरण, अनुष्ठान करतात. या पर्वात देवी भगवती रजस्वला होते . तिच्या योनी महामुद्रेवर पांढरे वस्त्र घातले जाते जे लाल रंगाचे होते. मंदिरातील पुरोहित वर्ग या वस्त्राचे तुकडे भाविकांना प्रसाद म्हणून देतात.या पर्वात केवळ भारतातीलच नाही तर बांग्लादेश, तिबेट आणि आफ्रिकेतील तंत्र उपासक येऊन साधना करतात. वाममार्ग साधनेचे हे महत्त्वाचे ठिकाण मानले जाते.गोरक्षनाथ, इस्माईल जोगी यासारख्या तंत्र उपासकांनी हेच स्थान आपले मानले आहे.

हेसुद्धा पहा[संपादन]

साचा:शक्तिपीठे साचा:हिंदू देवी देवता