Jump to content

संभोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कामक्रीडा (मैथुन) या पानावरून पुनर्निर्देशित)

संभोग (समागम, निषेचन) जीवशास्त्रीयदृष्ट्या अशी क्रिया आहे की ज्यात नराचे जननेंद्रिय मादीच्या जननमार्गात प्रवेश करते.[] मराठी भाषेत 'संभोग' ह्या शब्दाची ही प्रचलित व सर्वमान्य व्याख्या आहे. गेल्या काही दशकांत समलैंगिकता हा विषय काही प्रमाणात खुलेपणाने बोलला जात असल्यामुळे, 'समलिंगी संभोग' अथवा 'समलिंगी समागम' हा शब्दप्रयोग काही प्रमाणात वापरला जाऊ लागला आहे.

परंपरेनुसार संभोग हा पुरुष आणि स्त्री यांच्यातील प्रणय नैसर्गिक शेवट मानला जातो[] आणि आजही त्याच व्याखेत बांधला आहे. पण हल्लीच्या काळात या संज्ञेचा अर्थ बदलला आहे आणि यात तीन प्रकारच्या क्रियांचा समावेश आहे. हे तीन प्रकारचे संभोग म्हणजे योनी संभोग, ज्यात शिश्न योनीमध्ये प्रवेश करते व त्यामुळे नराचे शुक्राणू मादीच्या जननमार्गात प्रवेश करतात; मुख संभोग ज्यात स्त्री किंवा पुरुष जोडीदाराच्या जननेंद्रियाला मुखाने उत्तेजीत करतात, आणि गुदद्वार संभोग, ज्यात पुरुषाचे शिश्न किंवा काही वस्तू गुदद्वारात प्रवेश करते.[]

जवळ जवळ सर्व मनुष्येतर प्राण्यांमध्ये मादीच्या पाळीच्या सर्वांत प्रजननक्षम काळात प्रजनन होण्यासाठी संभोग केला जातो.[][]. पण बोनोबो[], डॉल्फिन[] आणि चिंपान्झी मादी प्रजननक्षम नसलेल्या काळात आणि कधी कधी समलिंगी संभोग करतात. मनुष्यांमध्ये संभोग मुख्यत: आनंदासाठी केला जातो.[]

लैंगिक संबंध

[१] Archived 2020-11-30 at the Wayback Machine.


संदर्भ

  1. ^ "sexual intercourse | Description & Facts". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2018-09-24 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Sexual Intercourse". 2008-01-12 रोजी पाहिले.
  3. ^ Curtis, Helena (1975). Biology (इंग्रजी भाषेत). Worth Publishers. p. 1065. ISBN 9780679010401.
  4. ^ Pineda, Mauricio; Dooley, Michael P. (2008-07-22). McDonald's Veterinary Endocrinology and Reproduction (इंग्रजी भाषेत). Wiley. p. 597. ISBN 9780813811062.
  5. ^ de Waal, F. B. (1995). "Bonobo sex and society". Scientific American. 272 (3): 82–88. ISSN 0036-8733. PMID 7871411.
  6. ^ "Central Park Zoo's gay penguins ignite debate". SFGate. 2004-02-07. 2018-09-24 रोजी पाहिले.
  7. ^ Diamond, Jared (2013-07-31). The Rise And Fall Of The Third Chimpanzee (इंग्रजी भाषेत). Random House. ISBN 9781409001409.