काडीवली देवकन्हई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काडीवली देवकन्हई
काडीवली देवकन्हई
काडीवली देवकन्हई

काडीवली देवकन्हई (इंग्लिश:Indian Wiretailed Swallow) हा एक पक्षी आहे.

ओळख[संपादन]

शेपटीच्या टोकाची पिसे पाच इंचापेक्षा अधिक लांब दिसायला सामन्य देवकन्हईसारखी ; परंतु खालीलसर्व भागांचा रंग पांढरा. डोके तांबूस, शेपटी किंचित दुभंगलेली. शेपटीच्या टोकाची पिसे तारेसारखी. काळसर पंखांवरील पांढऱ्या रेषा उठून दिसतात.

वितरण[संपादन]

निवासी अंशतःस्थलांतर करणारे. भारतात जवळजवळ सर्वच. पाकिस्तान आणि उत्तर भारत, तसेच ,नेपाळ सिक्कीम व भूतानमध्ये उन्हाळी पाहुणे. मार्च ते सप्टेंबर या काळात वीण.

निवासस्थाने[संपादन]

पाण्याजवळ असलेली माळराने आणि शेतजमिनीचा प्रदेश.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली