काकवी
उसाच्या रसापासून गूळ बनवताना जो पाक तयार होतो, त्याला काकवी असे म्हणतात. थोडक्यात हा द्रव रूपातील गूळ होय. याला हिंदीत शिरा, तर इंग्रजीत molases किंवा liquid jaggery असे म्हणतात. यातील साखरेचे प्रमाण, काढण्याची पद्धत आणि वनस्पतीच्या वयानुसार काकवी बदलतो. उसाच्या काकवीचा वापर प्रामुख्याने पदार्थ गोड करण्यासाठी आणि चवीसाठी केला जातो.[१]
गुऱ्हाळात तयार झालेली काकवी सामान्य तापमानाला बाटलीत एक वर्षापर्यंत साठवून ठेवता येते. साखरेला उत्तम पर्याय म्हणून काकवी वापरली जाते. आयुर्वेदानुसार काकवी पचायला हलकी असते. हिच्या सेवनाने शरीर आणि हाडे मजबूत होतात. विशेष करून अति शारीरिक श्रम करणाऱ्याला काकवी उपयुक्त ठरते. हिच्या सेवनाने रक्त शुद्ध होते, तसेच रक्तातील लोहाची कमतरता देखील भरून निघते. काविळीच्या आजारात काकवी उपयुक्त मानली जाते.[१]
पोषक मुल्य
[संपादन]काकवी मध्ये २२% पाणी, ७५% आणि अत्यल्प प्रमाणात मेद असते. १०० ग्रॅम काकवी पासून ब६ जीवनसत्व आणि विविध प्रकारच्या आहारातील क्षारांची गरज भगते. पहा तक्ता.[२][३]
घटक | मात्रा |
---|---|
किलो जुल्स | १२१३ |
पाणी | २१.९ ग्रॅम |
प्रथिने | ० ग्रॅम |
मेद | ०.१ ग्रॅम |
कार्बोहाइड्रेट | ७४.७३ ग्रॅम |
तंतुमय पदार्थ | ० ग्रॅम |
शर्करा | ७४.७२ ग्रॅम |
कॅल्शियम | २०५ ग्रॅम |
लोह | ४.७२ ग्रॅम |
मॅग्नेशियम | २४२ ग्रॅम |
फॉस्फरस | ३१ ग्रॅम |
पोटॅशियम | १४६४ ग्रॅम |
सोडियम | ३७ ग्रॅम |
जस्त | ०.२९ ग्रॅम |
मॅग्नेशियम | १.५३ |
थायमिन | ०.०४१ |
riboflavin_mg | 0.002 |
niacin_mg | 0.93 |
pantothenic_mg | 0.804 |
vitB6_mg | 0.67 |
choline_mg | 13.3 |
source_usda | 1 |
संदर्भ
[संपादन]- ^ a b "गुळापेक्षाही अधिक पौष्टीक आहे काकवी? काय आहेत फायदे जाणून घ्या!". दैनिक सकाळ. २४ डिसेंबर २०२३ रोजी पाहिले.
- ^ Full Link to USDA Database entry
- ^ "आरोग्यवर्धक गुळाचे फायदे जाणून घ्या". अग्रोवोन. २४ डिसेंबर २०२३ रोजी पाहिले.