कांडेचोर
Appearance
कांडेचोर (Asian palm civet) | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कांडेचोर
| ||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
| ||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||
पॅराडॉक्झ्युरस हर्माफ्रोडिटस पल्लास, १७७७ |
कांडेचोर (इतर नावे: काळमांजर , काळजा) हा एक सस्तन प्राणी आहे.
वर्णन
[संपादन]कांडेचोर हा प्राणी मांसाहारी आणि निशाचर आहे. याचा रंग काळसर असतो. याच्या अंगावर काळे जाड केस असतात. त्याच्या अंगाएवढीच त्याची शेपटीही लांब असते.
आढळ
[संपादन]कांडेचोर हा प्राणी भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, तसेच आग्नेय आशियाई देशांमध्ये आढळतो.
रहिवास
[संपादन]कांडेचोर हा प्राणी दिवसा झाडांच्या फांद्यांवर किंवा ढोलीत झोपतो. तो रात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो.
अन्न
[संपादन]कांडेचोर हा प्राणी मुख्यतः गोड पदार्थ, फळे, किडे इ. खातो.
जाती
[संपादन]कांडेचोराच्या दोन जाती आढळतात.
- काळा कांडेचोर
- तपकिरी कांडेचोर