कांडेचोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कांडेचोर (Asian palm civet)
कांडेचोर
कांडेचोर
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पॄष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: मांसाहारी
कुळ: मार्जार
जातकुळी: पॅराडॉक्झ्युरस
शास्त्रीय नाव
पॅराडॉक्झ्युरस हर्माफ्रोडिटस
पल्लास, १७७७

कांडेचोर (इतर नावे: काळमांजर , काळजा) हा एक सस्तन प्राणी आहे.

वर्णन[संपादन]

कांडेचोर हा प्राणी मांसाहारी आणि निशाचर आहे. याचा रंग काळसर असतो. याच्या अंगावर काळे जाड केस असतात. त्याच्या अंगाएवढीच त्याची शेपटीही लांब असते.

आढळ[संपादन]

Asian palm civet juvenile

कांडेचोर हा प्राणी भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, तसेच आग्नेय आशियाई देशांमध्ये आढळतो.

रहिवास[संपादन]

कांडेचोर हा प्राणी दिवसा झाडांच्या फांद्यांवर किंवा ढोलीत झोपतो. तो रात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो.

अन्न[संपादन]

कांडेचोर हा प्राणी मुख्यतः गोड पदार्थ, फळे, किडे इ. खातो.

जाती[संपादन]

कांडेचोराच्या दोन जाती आढळतात.

  1. काळा कांडेचोर
  2. तपकिरी कांडेचोर