कल्याण थाटातील राग
Appearance
भातखंडे-पद्धतीनुसार रूढ असलेल्या रागवर्गीकरणात कल्याण थाटाचा समावेश होतो. दाक्षिणात्य संगीतपद्धतीवरील ग्रंथांत या थाटाचे नाव कल्याणी असे आहे. मध्यम या स्वराचे शुद्ध व तीव्र असे दोन्ही किंवा त्यांपैकी एक भेद घेणे व बाकीचे सर्व स्वर शुद्ध ठेवणे, असे या थाटाचे स्वरूप असते. या थाटात प्रमुख असे तेरा राग मोडतात.
या रागांचे तीन उपवर्ग असे :
[संपादन]- मध्यम व निषाद हे स्वर वर्ज्य असलेले किंवा त्यांचा फक्त अवरोहात उपयोग करणारे राग
- आरोहात वा अवरोहात तीव्र मध्यम हा स्वर घेणारे राग
- दोन्ही मध्यम घेणारे राग. प्रमुख तेरा रागांची वरील तीन वर्गांतली विभागणी खालीलप्रमाणे :
- पहिला वर्ग : भूप, शुद्ध कल्याण, चंद्रकांत.
- दुसरा वर्ग : यमन, माल, श्रीहिंदोल.
- तिसरा वर्ग : हमीर, केदार, छायानट, कामोद, श्यामकल्याण, गौडसारंग, यमनी बिलावल.