कला दिग्दर्शक
Jump to navigation
Jump to search
कला दिग्दर्शक हा चित्रपटाचे चित्रीकरण होत असलेल्या इन-डोअर किंवा आऊट-डोअर जागेचे नेपथ्य तयार करतो. त्यासाठी लागणारे वेगवेगळे सेट डिझाइन करावे लागतात. त्यामुळे कला दिग्दर्शकाला डॉइंग, पेंटिंग, सुतारकाम आणि इंजिनिअरिंग या सगळ्याच गोष्टींचे ज्ञान असावे लागते.
हिंदी-मराठी चित्रपटांचे आणि बिग बॉस सारख्या बिग बजेट रिॲलिटी शोजचे व अशाच काही दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे कला दिग्दर्शन करणारे अनेक मराठी कलावंत आहेत. त्यांतले काही हे :-
- नरेंद्र राहुरीकर : यांनी दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचे आणि अनेक चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले आहे. सध्या ते एरलाइन्स या हिंदी दूरचित्रवाणी मालिकेचे कला दिग्दर्शन करीत आहेत. त्यासाठी त्यांना एक १०० फूट लांब आणि २० फूट रुंद असे संपूर्ण फोल्डेबल विमान बनवावे लागले आहे त्यासाठी विमानाची फायबरची तावदाने, प्रवाशांची आणि क्रू मेंबरांची बैठक व्यवस्था, आतले दिवे, पायलटचे केबिन, सामान ठेवण्याची व्यवस्था, सीट बेल्ट्स, फ्लोअरिग आदी सर्व बनवावे लागले आहे.
नरेंद्र राहुरीकर यांचे कलादिग्दर्शन असलेले काही चित्रपट :-
- ऑल द बेस्ट
- कौन बनेगा करोडपती (चित्रवाणी रिॲलिटी शो)
- गोलमाल
- गोलमाल रिटर्न्स
- गोलमाल ३
- चेन्नई एक्सप्रेस
- झलक दिखला जा (चित्रवाणी रिॲलिटी शो)
- जॅकपॉट
- नाच
- बिग बॉस (दूरचित्रवाणी रिॲलिटी शो)
- बोल बच्चन
- ब्ल्यू : या चित्रपटात पाण्याखालची अनेक दृश्ये होती, त्यामुळे हे कला दिग्दर्शन करणे आव्हानात्मक होते.
- मस्तीजादे
- लक
- वेलकम टू
- सिंघम रिटर्न्स