कलईकुंडा वायुसेना तळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कलईकुंडा वायुसेना तळ भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील कलईकुंडा येथे असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात खरगपूर शहराजवळ आहे.

येथे भारतीय वायुसेनेची १८ क्रमांकाची स्क्वॉड्रन तळ ठोकून आहे. हिच्यात भारतीय बनावटीची मिग-२७ विमाने असून या स्क्वॉड्रनला फ्लाइंग बुलेट्स असे टोपणनाव आहे.