Jump to content

करुणा शुक्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
करुणा शुक्ला
मतदारसंघ Janjgir

जन्म १ ऑगस्ट, १९५० (1950-08-01)
मृत्यू २७ एप्रिल, २०२१ (वय ७०)

करुणा शुक्ला (१ ऑगस्ट १९५० ते २७ एप्रिल २०२१) या भारताच्या 14 व्या लोकसभेच्या सदस्य होत्या.

चरित्र

[संपादन]

त्यांनी छत्तीसगडच्या जांजगीर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २०१३ पर्यंत भारतीय जनता पक्ष (भाजप) या राजकीय पक्षाच्या सदस्या होत्या. २००९ च्या निवडणुकीत ती कोरबा येथून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चरणदास महंत यांच्याकडून त्या पराभूत झाल्या. चरणदास केंद्र सरकारमध्ये मंत्री होते.

२५ ऑक्टोबर २०१३ रोजी त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. त्यावे़ळेस त्यांनी या पक्षाला "कथितपणे सत्तेच्या राजकारणाच्या ताब्यात असलेला पक्ष" असे म्हणले होते.[][]

करुणा या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाची होत्या.

२७ फेब्रुवारी २०१४ रोजी भाजपसोबतचा त्यांचा ३२ वर्षांचा संबंध संपुष्टात आणल्यानंतर, त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि छत्तीसगडमधील बिलासपूर मतदारसंघातून 2014 ची लोकसभा निवडणूक लढवली. त्यांचा भाजपच्या लखन लाल साहू यांनी १,७६,४३६ मतांनी पराभव केला.

त्यांनी २०१८ ची छत्तीसगड विधानसभेची निवडणूक राजनांदगावमधून लढवली होती. पण त्या या निवडणुकीत हरल्या होत्या. माजी मुख्यमंत्री श्री रमण सिंह यांनी त्यांचा पराभव केला होता.

२७ एप्रिल २०२१ रोजी त्यांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Atal Bihari Vajpayee's niece Karuna Shukla joins Congress, slams Narendra Modi".
  2. ^ "AB Vajpayee's niece Karuna Shukla quits BJP - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया.
  3. ^ Atal Bihari Vajpayee’s niece, former MP, Karuna Shukla dies of Covid-19

बाह्य दुवे

[संपादन]