Jump to content

करण सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(करणसिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
करण सिंग

राज्यसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२८ जानेवारी २०००

कार्यकाळ
१९६४ – १५ मे १९६७

जन्म ९ मार्च, १९३१ (1931-03-09) (वय: ९३)
कान, फ्रान्स
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वडील हरी सिंग

डॉ. करण सिंग ( ९ मार्च १९३१) हे भारत देशाच्या काँग्रेस पक्षामधील वरिष्ठ नेते व विद्यमान राज्यसभा सदस्य आहेत. करण सिंग हे जम्मू आणि काश्मीर संस्थानाचा शेवटचा राजा हरी सिंग ह्यांचे पुत्र आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळामध्येच हरी सिंगला काश्मीर संस्थान भारतामध्ये विलिन करणे भाग पडले. गृहमंत्री वल्लभभाई पटेल ह्यांच्या सल्ल्यावरून हरी सिंगने करण सिंग ह्यांना काश्मीरचा कार्यवाहू प्रमुख नेमले. १९५२ साली करण सिंगांना काश्मीरचा सद्र-ए-रियासत नेमण्यात आले. ह्या पदावर १२ वर्षे राहिल्यानंतर करण सिंग जम्मू आणि काश्मीर राज्याचे पहिले राज्यपाल बनले. १९६७ साली राज्यपालपदाचा राजीनामा देऊन करण सिंग पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांच्या मंत्रीमंडळात पर्यटन व नागरी उड्डाण मंत्री बनले. वयाच्या ३६व्या वर्षी कॅबिनेट मंत्री बनलेले ते सर्वात तरुण राजकारणी होते. त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारमध्ये अनेक पदे हाताळली. १९६७ ते १९८४ दरम्यान करण सिंग सलग चार वेळा उधमपूर मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आले. १९८४ साली त्यांनी जम्मू मतदारसंघामधून अपक्ष म्हणून निवडणुक लढवली परंतु त्यांचा पराभव झाला.

१९८९ ते १९९० दरम्यान करण सिंग अमेरिकेचे भारतीय राजदूत ह्या पदावर होते. २८ जानेवारी २००० पासून ते राज्यसभा सदस्य आहेत. २००५ साली करण सिंगांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला.

बाह्य दुवे

[संपादन]