कपिलवस्तु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कपिलवस्तु भारतीय उपखंडातील एक प्राचीन शहर होते. तसेच ही शाक्यांची राजधानी होती. गौतम बुद्ध राजकुमार सिद्धार्थ असताना त्यांनी कपिलवस्तु येथे २९ वर्षे वास्तव्य केले होते. कपिलवस्तु हे गौतम बुद्धांचे बालपणाचे निवासस्थान आहे, कारण ही शाक्यांची राजधानी असल्याने त्यांचे वडील शुद्धोधन येथील राजे होते.