कनैयालाल माणेकलाल मुन्शी

कनैयालाल माणेकलाल मुन्शी (प्रचलीत नाव: के.एम. मुन्शी) (३० डिसेंबर, १८८७ - ८ फेब्रुवारी १९७१)[१] हे गुजरात मधील एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, लेखक, पत्रकार, व शिक्षणतज्ज्ञ होते. ते पेशाने वकील होते व त्यानंतर ते साहित्य व राजकारणाकडे वळले. गुजराती साहित्यात त्याचे नाव प्रसिद्ध आहे. भारतीय विद्या भवन ही प्रसिद्ध शिक्षणसंस्था त्यांनी १९३८ साली स्थापन केली. विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता.
श्रीअरविंद आणि मुन्शी
[संपादन]मुन्शी जेव्हा बडोदा कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा प्रा. अरविंद घोष हे त्यांचे शिक्षक होते.[१] पुढे सुमारे ३० वर्षानंतर म्हणजे १९५० साली त्यांची श्रीअरविंद यांच्याशी पुन्हा भेट झाली. अखंड भारत (पाकिस्तानसह भारत) याविषयी श्रीअरविंद यांनी त्यांना निश्चितार्थक ग्वाही दिली होती, असे मुन्शी यांनी सांगितले होते. श्रीअरविंद यांनी १९०९ साली उत्तरपाडा येथे केलेल्या भाषणाचा त्यांच्यावर दीर्घकाळ प्रभाव होता, हे त्यांनी श्रीअरविंदाना ३० जुलै १९५० साली लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.[२]
संदर्भ
[संपादन]- 1 2 "Kanaiyalal Maneklal Munshi". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2025-06-22.
- ↑ श्रीअरविंद (२०२५). उत्तरपाडाचे भाषण. डॉ.केतकी मोडक द्वारे भाषांतरित. पुणे: ज्योतिर्मयी मिडिया हाउस.