कदिम शहापुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कदिम शहापुर हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील एक गाव आहे.

कदिम शहापुर हे गाव औरंगाबाद पासून २५ किमी.अंतरावर औरंगाबाद-पुणे हायवेपासून २ कि.मी आग्नेय दिशेला आहे तसेच, गंगापुरपासून १७ किमी.अंतरावर आहे.

गावात प.पु.पांडुरंगशाश्री आठवले प्रेरीत स्वाध्याय परिवाराचे कार्य चालते आणि त्या माध्यमातून गावात "लोकनाथ अम्रुतालयम्" आहे. गावाची लोकसंख्या अंदाजे १२०० च्या जवळपास आहे[ संदर्भ हवा ].गाव पु‍र्णतः हागणदरीमुक्त असून,गावाला 'गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान' याअंतर्गत जिल्हा स्तरावरील तिसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे.[ संदर्भ हवा ]गावात सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते आहेत.गावातील सांडपाणी शो़षखड्यांद्वारे जमिनीत मुरवले जाते.