ऑलिव्ह रिडले कासव
Appearance
ऑलिव्ह रिडले कासव (इंग्लिश:Olive Ridley Turtle; शास्त्रीय नाव:Lepidochelys olivacea) हा एक भूपृष्ठवंशीय प्राणी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- कोठे आढळतात- जगभरातील उष्णकटिबंधीय किनारे,भारतात सुंदरबन (दलदलीच्या प्रदेशानजीक)आढळते.
- प्राकृतिक अधिवास- उष्ण कटिबंध व उपोष्ण कटिबंध
- वजन- 50 कि.ग्रॅम.पर्यंत
- पृष्ठत्वर्म (Carapace)-
- लांबी- 60ते 70सें.मी.
- आकार- फारसे खडबडीत नसलेले, पसरट व तंबूच्या आकाराचे. पार्श्वकांच्या 5 किंवा जास्त जोड्या.
- रंग- ऑलिव्ह हिरवा
- अधरत्वर्म (Plastron) - पिवळसर व दोन्ही बाजूला छिद्र असलेले.
- डोक्याचा आकार- मोठे, त्रिकोणी आकाराचे, वरचा जबडा अंकुशाकार
- पाय- पाय वल्ह्यासारखे व पुढील प्रत्येक पायावर एक नख
- खाद्य- मृदुकाय प्राणी, जेली फिश इ.
- वीणीचा काळ- ह्या कासवांचा वीणीचा काळ वर्षभर प्रामुख्याने नोव्हेंबर ते मार्च असा असतो. साधारणतः रात्रीच्या वेळी मादी अंडी घालते. एका वीणीच्या हंगामात 1ते3 वेळा साधारणतः 20 ते 28 दिवसांच्या अंतराने अंडी घातली जातात. एका वेळी 100 ते 200 अंडी घातली जातात. दोन वीण हंगामातील अंतर 1 ते 2 वर्षे एवढे असते.45 ते 55 दिवसांत अंडी नैसर्गिक रित्या उबतात.
- सद्यस्थिती - कातडी व तेल काढण्यासाठी प्रौढ कासवांची हत्या केली जाते. अंड्यांचा खाद्य म्हणून उपयोग केला जातो. अंडी घालण्याच्या किनाऱ्यावरील जागांचा विनाश यामुळे ही जात संकटात आहे. भारतीय वन्य जीव (संरक्षण) कायदा 1972 मधील अनुसूची -1 अन्वये संरक्षित
या प्राण्याचा अधिवास पाण्यात असला तरी तो श्वाशोच्छवास नाकानेच करतो. त्यासाठी त्याला वरचेवर जलपृष्ठावर यावे लागतो. फुप्फुसांची हवा साठवणूकक्षमता अधिक असल्यामुळे दोन श्वासातील अंतर अधिक असते. त्यामुळे तो उभयचर वर्गात मोडत नाही.