Jump to content

ऑगुस्तो पिनोचे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑगुस्तो पिनोचे

चिलीचा २९वा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
११ सप्टेंबर १९७३ – ११ मार्च १९९०
मागील साल्व्हादोर आयेंदे
पुढील पॅट्रिशियो एल्विन

चिलीचा लष्करप्रमुख
कार्यकाळ
२३ ऑगस्ट १९७३ – ११ मार्च १९९८

जन्म २५ नोव्हेंबर, १९१५ (1915-11-25)
बाल्परेझो, चिली
मृत्यु १० डिसेंबर, २००६ (वय ९१)
सान्तियागो, चिली
धर्म रोमन कॅथलिक
सही ऑगुस्तो पिनोचेयांची सही

ऑगुस्तो होजे रामोन पिनोचे उगार्ते (स्पॅनिश: Augusto José Ramón Pinochet Ugarte; २५ नोव्हेंबर १९१५ - १० डिसेंबर २००६) हा चिली देशाचा राष्ट्राध्यक्ष व हुकुमशहा होता. तसेच तो १९७३ ते १९९८ दरम्यान चिलीचा लष्करप्रमुख देखील होता.

११ सप्टेंबर १९७३ रोजी चिलीमध्ये घडलेल्या एका लष्करी बंडादरम्यान तत्कालीन राष्ट्राध्यक्ष साल्व्हादोर आयेंदेची सत्ता उलथवून लावत पिनोचे सत्तेवर आला व चिलीमधील लोकशाही सरकार संपुष्टात आले. समाजवादी विचाराच्या आयेंदेच्या कम्युनिस्ट राजवटीला विरोध दर्शवणाऱ्या अमेरिकेचा ह्या बंडाला गुप्त पाठिंबा होता. ह्याच दिवशी आयेंदेने गूढ परिस्थितीमध्ये आत्महत्त्या केली. पुढील १७ वर्षे पिनोचेने चिलीवर हुकुमत गाजवली. त्याच्या राजवटीदरम्यान अनेक राजकीय विरोधक व समाजवादी पक्षाच्या सदस्यांना ठार मारले गेले.

खुल्या अर्थव्यवस्थेचे स्वागत करणाऱ्या पिनोचेने चिलीमधील सरकारी उद्योगांचे खाजकीकरण केले तसेच अनेक उद्योग परकीय गुंतवणूकीसाठी खुले केले. पिनोचेच्या कारकिर्दीमध्ये चिलीने झपाट्याने प्रगती केली व तो लॅटिन अमेरिकेमधील सर्वात सुबत्त देशांपैकी एक बनला. परंतु पिनोचेच्या फॅसिस्ट धोरणांमुळे चिलीमधील आर्थिक असमानता वाढीला लागली. पिनोचेवर मानवी हक्क उल्लंघनाचे असंख्य आरोप झाले व १० ऑक्टोबर १९९८ रोजी त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. मार्च २००० मध्ये सुटकेनंतर चिलीमध्ये परतल्यानंतर पिनोचेवर भ्रष्टाचार, हत्या, अपहरण इत्यादी अनेक आरोपांसाठी अनेक खटले भरले गेले व त्याला आयुष्यभरासाठी गृहकैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. १० डिसेंबर २००६ रोजी पिनोचेचे निधन झाले.

बाह्य दुवे

[संपादन]