ऐश्वर्या पिसे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
वैयक्तिक माहिती | ||
---|---|---|
जन्म |
14 ऑगस्ट 1995 (वय 25) बंगळुरू, कर्नाटक, भारत | |
Sport | ||
देश | भारत | |
खेळ | सर्किट रेसिंग / ऑफ रोड रेसिंग / रॅली | |
पदक विक्रम
|
ऐश्वर्या पिसे (जन्म १४ ऑगस्ट १९९५) ही एक भारतीय सर्किट आणि ऑफ-रोड मोटरसायकल रेसर आहे. मोटरस्पोर्ट्स या क्रीडा प्रकारात मोटरसायकल्सच्या स्पर्धेत जागतिक विजेतेपद मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे.
ऐश्वर्याने २०१७ आणि 2018 मध्ये राष्ट्रीय रॅली चॅम्पियनशिपची जेतेपदे जिंकली आहेत. २०१६ आणि २०१७ मध्ये तिने रोड रेसिंग आणि रॅली चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रीय अजिंक्यपदे जिंकली. (3) २०१८ मध्ये स्पेनमधील बाहा एरोगॉन वर्ल्ड रॅलीमध्ये भाग घेणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. [2]
वैयक्तिक माहिती
[संपादन]ऐश्वर्या पिसेचा जन्म बंगळुरूत झाला, तिथेच तिचे बालपण गेले.
शाळेत असताना तिने बाईकर होण्याचा निर्णय घेतला, परंतु तिच्या कुटुंबाला ते सुरुवातीला पटले नाही. तिने पुढे जाउन एखादी सामान्य नोकरी करावी, अशी तिच्या पालकांची आणि आजी-आजोबांनी इच्छा होती. [3]
त्यावेळी देशात काही मोजक्याच महिला रेसर होत्या. कुठलेही पालक त्यांच्या मुलींना रेसिंग करू देणार नाही, मग रेसिंगला एक पेशा म्हणून स्वीकारणे तर खुपच दूरची गोष्ट. अखेर तिची आई तिच्या पाठीशी उभी राहिली आणि तिला स्वतःचा मार्ग निवडण्याची मुभा दिली. [4]
ऐश्वर्या नऊ वर्षांची असताना तिचे आईवडील विभक्त झाले. बारावीच्या परीक्षेत चांगले गुण न मिळाल्यावर तिच्या वडिलांनी तिला घरातून बाहेर पडण्यास सांगितले. मग ती तिच्या आईकडे गेली, जिथे तिला स्वतःला समजून घ्यायला, काही नवीन प्रयोग करायला वेळ मिळाला.
तिथे ती बाईक चालवू लागली. दर आठवड्याच्या अखेरीस ती मित्रांबरोबर बाईक ट्रिप्सवर जाऊ लागली. त्यानंतर ती MTVच्या एका कार्यक्रमात झळकली, ज्यात तिने गुजरात ते मेघालयातील चेरापुंजी हे 8,000 किलोमीटरचे अंतर आपल्या बाईकवरून 24 दिवसात पार केले.
२०१७ मध्ये TVS रेसिंग संघाने तिच्याशी संपर्क साधला, आणि तिला आर्थिक स्थैर्य मिळालं, तिचा आत्मविश्वास बळावला. [3]
व्यावसायिक कामगिरी
[संपादन]२०१६ मध्ये पिसेने बंगळुरूच्या अपेक्स रेसिंग अकादमीमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने TVS वन मेक चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण केले आणि विजय मिलवला २०१६, २०१७ आणि २०१९ या वर्षांमध्ये फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लबने तिचा मोटरस्पोर्ट्समधील विलक्षण महिला या विशेष पुरस्काराने तिचा गौरव केला. [6]
२०१७ मध्ये तिने रेड दी हिमालय स्पर्धा जिंकली, जी इतकी कठीण स्वरुपची असते की अनेक स्पर्धकांना मधूनच सोडावी लागते. सोबतच दक्षिण डेअर आणि TVS अपाचे लेडीज वन मेक चॅम्पियनशिप या स्पर्धासुद्धा जिंकल्या. पुढे चालून तिने २०१७ च्या भारतीय राष्ट्रीय रॅली जेतेपदावरही स्वतःचे नाव कोरले.
२०१८ मध्ये या कामगिरीची पुनरावृत्ती करत, पुन्हा तिने राष्ट्रीय रॅली चॅम्पियनशिप जिंकली. त्या वर्षी, ती बाहा एरोगॉन रॅलीत भाग घेणारी पहिली भारतीय महिला ठरली. परंतु तिथे एका अपघातात तिच्या स्वादुपिंडाला दुखापत झाली, ज्यामुळे तिला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. २०१७ मधील एका अपघातात झालेल्या कॉलर बोन दुखापतीनंतर हा तिच्या आयुष्यातील दुसरा मोठा अपघात होता. [7]
२०१९ साली शस्त्रक्रिया आणि आपली शक्ती मिळवण्यासाठी कठीण प्रशिक्षण घेऊन तिने FIM विश्व चषक स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकली. कुठल्याही जागतिक मोटरस्पोर्ट्स स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावणारी ती पहिली भारतीय ठरली. [5]
संदर्भ
[संपादन]Aishwarya_Pissay-Wikipedia
मोटरबाइक रेसिंग में परचम लहरातीं ऐश्वर्या पिस्साई[2]
Racer Aishwarya Pissay swings into top gear[3]
No more a man’s world, says World Cup winning racer Aishwary Pissay[4]
https://timesofindia.indiatimes.com/sports/racing/top-stories/aishwarya-pissay-1st-indian-to-win-world-title-in-motorsports/articleshow/70652104.cms (5)
http://www.fmsci.co.in/press-release-of-the-fmsci-awards-2019/ (6)
https://indianexpress.com/article/sports/motor-sport/who-is-aishwarya-pissay-motorsports-5901134/ (7)