एस.एस. रामदास
Appearance
एस.एस. रामदास हे एक भारतीय प्रवासी जहाज होते. पश्चिम किनाऱ्यावर मुंबईपासून फेऱ्या करणारे ४०६ टनाचे हे जहाज १९३६मध्ये बांधले गेले.
दुर्घटना
[संपादन]हे जहाज १७ जुलै, १९४७ला (गटारी अमावास्या) मुंबई ते रेवस फेरीसाठी निघालेले असताना कुलाबा पोइंटपासून ८ किमी अंतरावर काश्याच्या खडकाजवळ अंदाजे सकाळी ८:०५ वाजता वादळात सापडून बुडले. यावरील ७००+ प्रवाशांपैकी ६९० व्यक्ती बुडाल्या.