एस.एस. भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


जन्‍म व जडण-घडण[संपादन]

प्रा. डॉ. एस. एस. भोसले यांचे पूर्ण नाव संभाजी सावळाराम भोसले आहे. त्‍यांचा जन्‍म कोल्हापूर जिह्यातील कागल येथे झाला. कोल्हापूर येथील वास्तव्याच्या काळात त्यांना ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक ‘झोंबी’कार डॉ. आनंदी यादव वर्गमित्र लाभले. महाविद्यालयीन वाटचालीच्या उंबरठय़ावर असतानाच डॉ. भोसले यांना प्रख्यात साहित्यिक ज्ञानपीठ विजेते लेखक वि. स. खांडेकर यांचा लेखनकामाच्या निमित्ताने प्रदीर्घ सहवास लाभला. खांडेकर ओघवत्या भाषेत एखादी कथा, कादंबरी सांगायचे आणि सुवाच्य अक्षरात लिहिण्याचे कार्य डॉ. भोसले करायचे. या प्रदीर्घ सहवासामुळे त्यांच्याशी खांडेकरांचा स्नेह जमला. कोल्हापूरच्या वास्तव्यात प्राध्यापक म्हणून कार्य करताना त्यांना ‘पानिपत’कार विश्वास पाटीलसारखा साहित्य क्षेत्रातील जाणकार विद्यार्थी लाभला. १९७९च्या सुमारास डॉ. भोसले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून रुजू झाले. पुढे त्‍यांनी १९९३ ते १९९५ या काळात विभागप्रमुख म्‍हणूनही कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.चे अनेक विद्यार्थी पुढील काळात नावारूपाला आले. राज्य साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ यांचे सदस्य राहिलेल्या भोसले यांच्या नावावर १८ स्वलिखित आणि २२ संपादित पुस्तके जमा आहेत. [http://www.saamana.com/dr-s-s-bhosale/ १]

ग्रंथसंपदा[संपादन]

  • खांडेकर : व्यक्ती आणि साहित्य
  • सूर्ययुगाची सुरूवात : प्रेरणा आणि निर्मिती
  • अधिकउणे
  • प्रात:स्मरण
  • होऊ कसे उतराई
  • प्र.के. अत्रे साहित्य आणि समीक्षा
  • राजर्षी शाहू : संदर्भ आणि भूमिका
  • नागरी परंपरेचे लोकाविष्कार
  • सारे काही जनतेसाठी
  • तुकाराम  गाथा

पुरस्‍कार व मान-सन्‍मान[संपादन]


चुका उधृत करा: "http://www.saamana.com/dr-s-s-bhosale/" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="http://www.saamana.com/dr-s-s-bhosale/"/> खूण मिळाली नाही.