एव्हो मोरालेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एव्हो मोरालेस
एव्हो मोरालेस


बोलिव्हियाचा ८०वा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२२ जानेवारी २००६
मागील एदुआर्दो रॉद्रिग्वेझ

जन्म २५ ऑक्टोबर, १९५९ (1959-10-25) (वय: ६२)
ओरिनोका, बोलिव्हिया
सही एव्हो मोरालेसयांची सही

हुआन एव्हो मोरालेस आय्मा (स्पॅनिश: Juan Evo Morales Ayma; जन्म: २६ ऑक्टोबर १९५९) हा दक्षिण अमेरिकेमधील बोलिव्हिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २००६ साली सत्तेवर आलेला मोरालेस अनेक इतिहासकारांच्या मते लोकशाही मार्गाने निवडून आलेला व स्थानिक आदिवासी वंशाचा असलेला बोलिव्हियाचा पहिलाच राष्ट्राध्यक्ष मानला जातो. मोरालेसने सत्तेवर आल्यानंतर बोलिव्हियामध्ये अनेक आर्थिक सुधारणा हाती घेतल्या व देशाची धोरणे समाजवादी विचारांच्या दिशेने वळवली. लॅटिन अमेरिकेमध्ये अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपाला मोरालेसचा तीव्र विरोध आहे.

मोरालेस बोलिव्हियामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. २००९ व २०१४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये तो प्रचंड बहुमताने विजयी झाला आहे. त्याच्या प्रशासनाने बोलिव्हियामधील गरिबी व निरक्षरता मोठ्या प्रमाणावर कमी केली आहे. परंतु जागतिक स्तरावर वादग्रस्त नेता मानला जातो. अनेक साम्यवादी टीकाकारांच्या मते मोरालेसला बोलिव्हियाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे साम्यवादी स्वरूपाची करण्यात अपयश आले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: