एल्डा एमा अॅन्डरसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एल्डा एमा अँडरसन (५ ऑक्टोबर, इ.स. १८९९:ग्रीन लेक, विस्कॉन्सिन, अमेरिका - १२ एप्रिल, इ.स. १९६१:ओक रिज, टेनेसी, अमेरिका) या एक अमेरिकन गणितज्ञ होत्या.

शिक्षण[संपादन]

१९२२मध्ये त्यांनी रिपन कॉलेजातून बॅचलर ऑफ आर्ट्‌स (AB) ची पदवी घsतली. विस्कॉन्सिन विद्यापीठातून त्या १९२४ साली मास्टर ऑफ आर्ट्‌स (AM) झाल्या.

अध्यापन[संपादन]

१९२४ ते १९२७ या कालावधीसाठी अँडरसन आयोवाच्या एका महाविद्यालयात प्राध्यापकपदी रुजू झाल्या. त्यानंतर त्यांची पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि गणित विभागांच्या डीनपदी नियुक्ती झाली. १९२९ साली त्या मिलवॉकी-डाउनर कॉलेजात पदार्थविज्ञान विभागाच्या प्राध्यापक होऊन १९३४ मध्ये त्या विभागप्रमुख झाल्या.

१९४१ साली पीएच.डी. झाल्यावर एल्डा अँडरसन प्रिन्स्टन विद्यापीठात सायंटिफिक रिसर्च आणि डेव्हलपमेन्टच्या कार्यालयात नोकरी करू लागल्या. येथेच त्यांनी मॅनहॅटन प्रोजेक्टचे काम केले.

प्रयोगशाळेत संशोधन[संपादन]

अँडरसन १९४३ साली लॉस अलामॉस प्रयोगशाळेत दाखल झाल्या. तेथे दिवसात १६ तास काम करून त्यांनी सायक्लोट्रॉनने तयार झालेल्या अणुतर कणांची आकारमाने मापली. त्याच प्रयोगशाळेत त्यानी शुद्ध युरेनियम-२३५ चा जगातला पहिला नमुना बनवला. त्या प्रयोगशाळेच्या एका वसतिगृहात रहायच्या त्या काळी स्त्रिया घालत नसत असे चौकटी-चौकटीचे शर्ट आणि जीन्स सारख्या वेशभूषाही करायच्या.

आरोग्य-विज्ञानासाठी काम[संपादन]

दुसर्‍या महायुद्धानंतर म्हणजे १९४७ साली अँडरसन मिलवॉकी-डाउनर कॉलेजात परतल्या. १९४९मध्ये त्यांनी आरोग्यविज्ञानात काम करायला सुरुवात केली. टेनेसीमधील ओक रिज राष्ट्रीय प्रयोगशाळेच्या आरोग्यविज्ञान शाखेत त्यानीने किरणोत्सर्गाचे आरोग्यावर दुष्परिणाम या विषयावर संशोधन केले आणि अभ्यासक्रमात आरोग्यविज्ञान हा विषय आणला.

जागतिक स्तरावर कार्य[संपादन]

अँडरसननी १९५५ साली स्टॉकहोममध्ये, १९५७ साली बेल्जियममध्ये आणि १९५८ मध्ये मुंबईत ह्या विषयाच्या प्रशिक्षणाची सोय केली. त्यानी हेल्थ फिजिक्स सोसायटी ही संस्था स्थापन केली आणि १९५९ साली त्याचे अध्यक्षपद स्वीकारले.

निधन[संपादन]

१९५६ साली ॲन्डरसनला ल्युकेमिया आणि ब्रेस्ट कॅन्सरने ग्रासले. तिच्या १९६१ सालच्या निधनानंतरही तिच्या नावाच्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात दर वर्षी तिचा सन्मानाने उल्लेख होतो.