Jump to content

एलईडी दिव्यांची माळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एलईडी हा एक प्रकारचा डायोड आहे. एलईडी दिव्यांच्या माळाचा उपयोग विविध प्रकारच्या विधुत रोशनाई साठी केला जातो. एलईडी माळेला विजेचे प्रमाण खूप कमी लागते.“लाइट इमिटींग डायोड” असा त्याचा फुल फॉर्म आहे.

एलईडीची पोलारिटी ओळखता येणे गरजेचे आहे. यामुळे एलईडी बल्ब जळत नाहीत.

महत्त्व आणि गरज

[संपादन]

एलईडी दिव्यांच्या माळे पासून लाइटची बचत होऊन माणसांची गरज भागवली जाते. त्यामुळे पैशांची बचत ही होते.माळेचे आकारमान छोटे व वजनाने कमी असल्याने ती कुठेही राहू शकते.

एल्‌ईडीचा वापर आता सर्वत्र झाला असून विविध उपकरणांत दिव्यांच्या साह्याने सूचना देण्यासाठी एल्‌ईडीचा वापर केला जातो. एलईडी दिव्यांचा माळेला ऐका सर्किट सहयाने तिची गतीवर नियंत्रण करू शकतो. यामध्ये विजेची खूप बचत होते. या सर्व दृष्टीने एलईडी माळ ही खूप महत्त्वाची व गरजेची वाटते.

उद्दिष्ट

[संपादन]

एलईडी माळ असल्याने तिचा कुठल्याही व्यक्तीच्या डोळ्याला त्रास होणार नाही. कमी खर्चात हा माळ बनते. तीची क्षमता दीर्घकाळ टिकू शकते.

एलईडी माळा बनवण्याची कृती

[संपादन]

एलईडी माळा बनवण्यासाठी डायोड, रेजिस्टर, इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर सिरामिक कॅपॅसिटर, एलईडी बल्ब ,वायर, होल्डर-कॅप, सोल्डर वायर, सोल्डर वायर, इंसुलेशन टेप आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे   सोल्डरिंग गण हे सर्व आवशक आहे. ही सर्व साहित्य बाजारात कमी दरात उपलब्ध आहेत. एलईडी माळा बनविण्यासाठी ४ ते ५ व्यक्ती गरज असते . वेणी विणून माळेला बल्ब सोल्डरिंग गणच्या सहयाने बनविणे .

      समजा ५० बल्बची  माळ बनविण्यासाठी  काही लागणारी साहित्य पुढील प्रमाणे :-पहिल तर २ mm एलईडी बल्ब ५० , होल्डर कॅप ५० ,वायर १५ मी. , रेजिस्टर (१००० k Ω ) १ , रेजिस्टर (१००k Ω ) १, डायोड (IN 4007) ४ , सोल्डर वायर १ , कॅपसिटर - इलेक्ट्रोलेटीक (१०µF)  १, कॅपसिटर - सिरॅमिक (४७०K) १ , पी. सी. बी. १ , इंसुलेशन टेप १ , मल्टीमीटर १ इ. साहित्याची गरज असते. माळेची सर्व आकृति नुसार जोडणी करून घ्यावी. हे करताना दक्षता ही घ्यावी .

एलईडी माळेचे प्रकार

[संपादन]

असंख्य प्रकारच्या एलईडी माळा आहेत.

५० एलईडी बल्बच्या माळ ,१०० एलईडी बल्बची माळ, वेणी माळ ,अशा प्रकारच्या एलईडी माळा असतात.