Jump to content

इडरसी धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एडरसी धरण या पानावरून पुनर्निर्देशित)

एडरसी धरण हे जर्मनीच्या मध्य भागातील हेसेन राज्यातील मोठे धरण आहे. इडर नदीवरील हे धरण १९०८ ते १९१४ दरम्यान बांधले गेले होते. हे मोठे जलविद्युत केंद्र आहे तसेच इडर आणि वेसेर नद्यांमधील नौकानयनासाठी पाण्याची पातळी राखण्यासाठी या धरणाचा उपयोग होतो. या धरणाची क्षमता १९,९३,००,००० मी इतकी आहे

दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश वायुसेनेने एका धाडसी मोहीमेत या धरणावर हल्ला चढवून हे फोडले होते. त्यामुळे आलेल्या पुरात अंदाजे ७० व्यक्ति मृत्यू पावले होते.[] हा पूर २०-२६ फूट उंचीच्या पाण्याच्या लाटेच्या स्वरूपात होता व हे पाणी ताशी २०-२५ किमी वेगाने खोऱ्यातून गेले. या पाण्याच्या लोंढ्याने खोऱ्यातील माती हेक्टरी १६० मी दराने समुद्राकडे वाहून गेली. जर्मनीने अटलांटिक भिंतीवर काम करणारे बिगारी कामगार येथे आणून हे धरण काही महिन्यांत दुरुस्त केले होते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Ralf Blank (May 2006). "Die Nacht vom 16. auf den 17. Mai 1943 – "Operation Züchtigung": Die Zerstörung der Möhne-Talsperre". Landschaftsverband Westfalen-Lippe. 2008-01-29 रोजी पाहिले.