Jump to content

ए.टी.आर. ४२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एटीआर ४२ या पानावरून पुनर्निर्देशित)
ए.टी.आर. ४२

एर वेल्सचे ए.टी.आर. ४२

प्रकार छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रॉपेलर विमान
उत्पादक ए.टी.आर.
पहिले उड्डाण ऑगस्ट १६, इ.स. १९८४
समावेश इ.स. १९८५
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
उत्पादन काळ इ.स. १९८४-सध्या
उत्पादित संख्या ३७७+
उपप्रकार ए.टी.आर. ७२

ए.टी.आर. ४२ हे ए.टी.आर. या विमान तयार करणाऱ्या कंपनीचे छोट्या पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. फ्रांसच्या एरोस्पेशिएल (आता एरबसचा भाग) आणि इटलीच्या एरइटालिया (आता लिओनार्दो एस.पी.ए.) या कंपन्यांनी भागिदारीत तयार केलेल्या या विमानाची शेवटची बांधणी तुलूझ येथे होते.

या विमानाचे पहिले उड्डाण १६ ऑगस्ट, १९८४मध्ये झाली तर सप्टेंबर १९८५ मध्ये याला व्यावसायिक उड्डाणांसाठी प्रमाणपत्र मिळाले. डिसेंबर १९८५मध्ये एर लिट्टोरलने या विमानाचे पहिले व्यावसायिक उड्डाण केले