एचएमएस रॉयल ओक
Appearance
एच.एम.एस. रॉयल ओक या नावाच्या रॉयल नेव्हीच्या आठ लढाऊ नौका होत्या.
- एच.एम.एस. रॉयल ओक (१६६४) - ७६ तोफा असलेली सेकंट रेट नौका. १६६७ मधील मेडवेवरील छाप्यात डच आरमाराने बुडविली.
- एच.एम.एस. रॉयल ओक (१६७४) - ७० तोफा असलेली थर्ड रेट नौका. १६७४मध्ये बांधलेल्या या नौकेची १६९०, १७१३ आणि १७४१मध्ये पुनर्बांधणी करण्यात आली.
- एच.एम.एस. रॉयल ओक (१७६९) - ७४ तोफा असलेली थर्ड रेट नौका. १८०५मध्ये हीचे एच.एम.एस. असिस्टन्स असे पुनर्नामकरण करण्यात आले.
- एच.एम.एस. रॉयल ओक (१८०९) - ७४ तोफा असलेली थर्ड रेट नौका. मुख्यत्वे बंदराच्या आसपास सेवारत.
- एच.एम.एस. रॉयल ओक (१८६२) - आयर्नक्लॅड फ्रिगेट.
- एच.एम.एस. रॉयल ओक (१८९२) - रॉयल सॉव्हरेन वर्गाची युद्धनौका.
- एच.एम.एस. रॉयल ओक (०८) - १९१४मध्ये बांधण्यात आलेली रिव्हेंज वर्गाची युद्धनौका दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस १९३९मध्ये स्कॅपा फ्लो येथे नांगरलेली असताना बुडविली गेली.