एच.एम.एस. रॉयल ओक (०८)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एच.एम.एस. रॉयल ओक
Disambig-dark.svg

एच.एम.एस. रॉयल ओक ही रॉयल नेव्हीची रिव्हेंज वर्गाची युद्धनौका होती. ही नौका इ.स. १९१४ ते १९१६ दरम्यान बांधण्यात आली. पहिल्या महायुद्धाच्या जुटलॅंडच्या लढाईत हीने भाग घेतला होता. त्यानंतर ही नौका अटलांटिक ताफा, गृह ताफा तसेच भूमध्य ताफ्यांचा भाग होती. १९२८मध्ये यावरील अधिकाऱ्यांचा रॉयल नेव्हीच्या उच्चाधिकाऱ्यांशी झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान रॉयल ओकच्या अधिकाऱ्यांच्या कोर्ट मार्शलमध्ये झाले. ऑक्टोबर १४, इ.स. १९३९ रोजी स्कॉटलॅंडच्या स्कॅपा फ्लो बंदरात जर्मन पाणबुडी यु-४७ने घातलेल्या छाप्यात ही नौका बुडाली. तिच्याबरोबर ८३३ खलाशी, अधिकारी व मुले मृत्यू पावली.

आपल्या २५ वर्षांच्या कारकीर्दीत रॉयल ओकचे अनेक वेळा नवीनीकरण करण्यात आले परंतु मुळात मंदगतीने चालणारी ही नौका दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीसच इतर लढाऊ नौकांच्या मानाने जुनाट ठरली होती.