एकल विद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एकल विद्यालय.jpg

एकल विद्यालय ही भारतातील ग्रामीण व अदिवासी भागांमधील निरक्षरता हटवण्याच्या उद्देशाने निर्माण झालेली व विना-नफा चालवली जाणारी एक शिक्षणसंस्था आहे.

भारत देशातील सरासरी साक्षरतेचे प्रमाण आजच्या घडिला ६५.४ ट्क्के असले तरीही देशाच्या अनेक ग्रामीण व मागासलेल्या भागांमध्ये अद्याप हे प्रमाण ११ टक्के एवढेच आहे. २०११ सालापर्यंत ह्या भागांतील निरक्षरता पूर्णपणे संपवण्याचे एकल विद्यालय चळवळीचे ध्येय आहे.

सप्टेंबर २००९ अखेरीस भारतभर एकल विद्यालयाच्या एकुण २७,११० शाळा उघडल्या गेल्या आहेत, ज्यांमध्ये ७,७८,९६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.


बाहेरील दुवे[संपादन]