ऊबांगी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ऊबांगी नदी कॉंगो नदीची उपनदी आहे. ही नदी मध्य आफ्रिकेत म्बोमू आणि उएलेले नद्यांच्या संगमापासून सुरू होते आणि पश्चिमेस वाहत कॉंगो नदीस मिळते.

ही नदी मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक आणि डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोमधील सीमा आहे. पुढे ही नदी दक्षिणेस वळते तेव्हा डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि कॉंगोच्या प्रजासत्ताकामधील सीमा होते.