Jump to content

ऊदा देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Uda Devi (es); উড়া দেবী (bn); ઉદા દેવી (gu); Uda Devi (ast); Uda Devi (ca); Uda Devi (bcl); ଉଷା ଦେବୀ (or); Uda Devi (sq); ഉദാ ദേവി പാസി (ml); Uda Devi (nl); ऊदा देवी (mr); वीरांगना ऊदा देवी पासी (hi); ఉడా దేవి (te); ਉਦਾ ਦੇਵੀ (pa); Veerangana Uda Devi Pasi (en); ಉದಾ ದೇವಿ (kn); Veerangana Uda Devi Pasi (en-us); உதா தேவி (ta) উনিশ শতকের ভারতীয় সৈনিক (bn); 1857 ના ક્રાંતિના પાસી યોદ્ધા (gu); ഇന്ത്യന്‍ സ്വാതന്ത്ര്യ സമരത്തില്‍ പങ്കെടുത്ത വനിത (ml); Indiaas krijger (?-1857) (nl); 1857 ರ ಭಾರತೀಯ ದಂಗೆಯಲ್ಲಿ ಬಾಗವಹಿಸಿದವರು (kn); 1857 के संग्राम की पासी वीरांगना (1830-1857) (hi); 1857 నాటి భారతీయ తిరుగుబాటులో యోధురాలు (te); ସନ ୧୮୫୭ର ସ୍ୱାଧୀନତା ସଂଗ୍ରାମୀ (or); Pasi Warrior of Revolution of 1857 (en); محاربة هندية (ar); Pasi Warrior of Revolution of 1857 (en-us); एकोणिसाव्या शतकातील भारतीय योद्धा (mr) Uda Devi, Uda Pasi, Pasi Warrior, Pasi Hero, Pasi of Avadh, Pasi of Lucknow, Uda Devi Pasi (en); ऊदा देवी, ऊदा पासी, पासी योद्धा, अवध के पासी योद्धा, लखनऊ के पासी योद्धा (hi); Uda Devi, Uda Pasi, Pasi Warrior, Pasi Hero, Pasi Warrior of Avadh, Pasi Warrior of Lucknow (en-us)
ऊदा देवी 
एकोणिसाव्या शतकातील भारतीय योद्धा
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
मृत्यू तारीखइ.स. १८५७
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

ऊदा देवी १८५७ च्या स्वातंत्रयुद्धातील एक लढवय्यी होती, जिने जुलमी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध लढा दिला.

१८५७ च्या उठावातील ऊदा देवी आणि आणि इतर दलित स्त्री योद्ध्याचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने वीरांगना म्हणून त्यांचे स्मरण केले जाते.[]

ऐतिहासिक घटना

[संपादन]

भारतीय लोकांमधील ब्रिटिश प्रशासनाविरुद्ध वाढत जाणारा राग पाहून, ऊदा देवी जिल्ह्याच्या राणीकडे, म्हणजे बेगम हजरत महलकडे युद्धात सहभागी होण्यासाठी गेली. येऊ घातलेल्या युद्धासाठी तयार रहाण्याकरिता बेगम हजरत महलने तिला स्त्रियांची पलटण उभी करण्यासाठी मदत केली.[] जेव्हा ब्रिटिशांनी अवधवर हल्ला केला तेव्हा ऊदा देवी आणि तिचा नवरा दोघेही सशस्त्र प्रतिकारात सहभागी झाले. जेव्हा तिला तिच्या नवऱ्याला लढाईत वीरमरण आल्याचे समजले तेव्हा तिने पूर्ण शक्तीनिशी शेवटची मोहीम उघडली.[] जेव्हा ब्रिटिशांनी कॉलीन कॅंपबेल ह्याच्या नेतृत्वाखाली लखनौ शहरातील सिकंदर बागेवर हल्ला केला, तेव्हा त्याला दलित स्त्री लष्कराचा सामना करावा लागला. लढाईच्या ह्या क्षणांविषयी कविता लिहिल्या गेल्या आहेत आणि अनेक गीते गायली गेली आहेत. त्यापैकी एक गाणे:

“कोई उनको हब्सीन कहता, कोई कहता नीच अछूत”
“अबला कोई उन्हे बतलाए, कोई कहे उन्हे मजबूत”

(त्यांना कोणी काळी आफ्रिकी गुलाम म्हणते, तर कोणी शुद्र-अस्पृश्य, काही जण त्यांना अबला म्हणतात, तर काही जण सामर्थ्यवान म्हणतात.)[]

सिकंदरबागचे युद्ध

[संपादन]

नोव्हेंबर १८५७ मध्ये सिकंदर बाग येथे ऊदा देवी यांनी ब्रिटिश सैन्याशी युद्ध केले. आपल्या सैन्याला युद्धासाठी सूचना देऊन झाल्यावर ऊदा देवी स्वतः पिंपळाच्या झाडावर चढल्या आणि आपल्या बंदुकीने पुढे सरसावणाऱ्या ब्रिटिश फ़ौजेवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यावेळच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या लक्षात आले की, अनेक सैनिकांना वरच्या दिशेने आलेल्या गोळ्यांनी ठार केलेले होते.[] वरून येणाऱ्या गोळ्या आसपासच्या झाडांवर लपून बसलेल्या नेमबाजाच्या बंदूकीतून येत असाव्यात असा अंदाज त्या अधिकाऱ्याने बांधला आणि आपल्या सैनिकांना आसपासच्या झाडांवर गोळीबार करण्यास सांगितले. झाडावरून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला मारून खाली पाडण्यात यश आल्यावर, त्यांनी तपासले असता ती ऊदा देवी होती. विल्यम फ़ोर्ब्स-मिशेल यांच्या रेमिनिसन्सेस ऑफ़ द ग्रेट म्युटीनी या पुस्तकात ऊदा देवी बद्दल ते लिहितात, "ती दोन जुन्या बनावटीच्या काव्हीलरी पिस्तूलांनी सज्ज होती, एक तीच्या हातात तर दुसरे कमर पट्ट्यात खोवलेले होते आणि त्यातल्या गोळ्या अजुनही भरलेल्या होत्या, तिच्या जवळ गोळ्यांनी भरलेला एक बटवा होता, तिने स्वतःच युद्धापूर्वी काळजीपूर्वक तयार केलेल्या लपायच्या झाडावरील जागेवरून सहा पेक्षा जास्त सैनिकांना ठार केले होते."[] पिलभीतचा पासी समुदाय, प्रत्येक दरवर्षी नोव्हेंबरच्या 16 तारखेला ऊदा देवींचा हुतात्मादिन साजरा करण्यासाठी एकत्र येतो.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Gupta, Charu (18 एप्रिल 2016). The Gender of Caste: Representing Dalits in Print. University of Washington Press. ISBN 9780295806563. 9 ऑक्टोबर 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  2. ^ Gupta, Charu (2007). "Dalit 'Viranganas' and Reinvention of 1857". Economic and Political Weekly. 42 (19): 1739–1745. JSTOR 4419579.
  3. ^ Narayan, Badri (7 नोव्हेंबर 2006). Women Heroes and Dalit Assertion in North India: Culture, Identity and Politics. SAGE Publications India. ISBN 9788132102809. 9 ऑक्टोबर 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  4. ^ Verma, San 1857, p 36
  5. ^ Verma, R.D (1996). Virangana Uda Devi. Mahindra Printing Press.
  6. ^ Safvi, Rana (7 एप्रिल 2016). "The Forgotten Women of 1857". The Wire-GB. 11 ऑगस्ट 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 जून 2016 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  7. ^ "Dalit group recalls its 1857 martyr Uda Devi". द टाइम्स ऑफ इंडिया-GB. 16 नोव्हेंबर 2015. 24 मे 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 एप्रिल 2017 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)