उ गो मोहीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उ गो मोहीम किंवा ऑपरेशन सी (जपानी: ウ号作戦) ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी सैन्याने आखलेली मोहीम होती.

या मोहीमेनुसार जपानी सैन्याने म्यानमार (तेव्हाचे ब्रह्मदेश) मधून ईशान्य भारतातील ब्रिटिश ठाण्यांवर चाल केली. तेथून पुढे नागालँडमणिपूर प्रदेशांतून वायव्येस कूच करीत ब्रह्मपुत्रेचे खोरे काबीज करण्याचा बेत होता. यात आझाद हिंद फौजेने जपानी सैन्याची साथ दिली होती. मार्च-जून १९४४च्या दरम्यान केल्या गेलेल्या या मोहीमेचे पर्यवसान इम्फालकोहिमाच्या लढायांमध्ये झाले. या दोन्ही ठिकाणी ब्रिटिश भारतीय सैन्याने जपानी सेना व आझाद हिंद फौजेचा सडकून पराभव केला व त्यांना भारतातून माघार घेण्यास भाग पाडले. येथे पराभव झाल्यावर जपानी सैन्याने भारताचा व पर्यायाने ब्रिटिशांचा नाद सोडला व स्वबचावाची तयारी सुरू केली. या लढायांची तुलना अनेकदा स्टालिनग्राडच्या वेढ्याशी केली जाते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.