Jump to content

उपक्रम (संकेतस्थळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उपक्रम या पानावरून पुनर्निर्देशित)

उपक्रम हे एक मराठी संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ आता फक्त वाचनासाठी खुले आहे, त्यांच्यामधील लेखांत आता भर टाकता येत नाही.

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, इतिहास या व यासारख्या इतर विषयांवर मराठीतून लेखन आणि चर्चा व्हावी, या विषयांशी निगडीत समुदाय बनावेत, उपक्रम चालावेत या उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळावर प्राधान्याने माहितीप्रधान लेखन आणि चर्चा व्हावी असा या संकेतस्थळाच्या चालकांचा स्थापनेच्यावेळी मानस होता.

उपक्रम समुदाय

[संपादन]

बऱ्याच लोकप्रिय संकेतस्थळांवर असणाऱ्या ग्रुप किंवा कम्युनिटी सारखी सुविधा ‘उपक्रमा’वर समुदायांच्या स्वरूपात उपलब्ध होता. हे समुदाय कोणत्याही उपक्रमाशी संबंधित लोकांना किंवा विशिष्ट विषयांमध्ये रस असणाऱ्या लोकांना एक मंच मिळवून देई. येथे सदस्य त्यांच्या सामायिक आवडीनिवडी किंवा ध्येय धोरणांवर लेख, चर्चा आणि प्रतिसादांच्या माध्यमातून माहितीचे आणि विचारांचे आदानप्रदान करू शकत.

बाह्य दुवे

[संपादन]