उपक्रम (संकेतस्थळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उपक्रम हे एक मराठी संकेतस्थळ होते. हे संकेतस्थळ आता फक्त वाचनासाठी खुले आहे, त्यांच्यामधील लेखांत आता भर टाकता येत नाही.

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान , गणित, कला, इतिहास या व यासारख्या इतर विषयांवर मराठीतून लेखन आणि चर्चा व्हावी, या विषयांशी निगडीत समुदाय बनावेत, उपक्रम चालावेत या उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळावर प्राधान्याने माहितीप्रधान लेखन आणि चर्चा व्हावी असा या संकेतस्थळाच्या चालकांचा स्थापनेच्यावेळी मानस होता.

उपक्रम समुदाय[संपादन]

बऱ्याच लोकप्रिय संकेतस्थळांवर असणाऱ्या ग्रुप किंवा कम्युनिटी सारखी सुविधा ‘उपक्रमा’वर समुदायांच्या स्वरूपात उपलब्ध होता. हे समुदाय कोणत्याही उपक्रमाशी संबंधित लोकांना किंवा विशिष्ट विषयांमध्ये रस असणाऱ्या लोकांना एक मंच मिळवून देई. येथे सदस्य त्यांच्या सामायिक आवडीनिवडी किंवा ध्येय धोरणांवर लेख, चर्चा आणि प्रतिसादांच्या माध्यमातून माहितीचे आणि विचारांचे आदानप्रदान करू शकत.

आजमितीस (६ जुलै २००७) ‘उपक्रमा’वर खालील समुदायांवर लेखन आढळते:-

१. आपल्या आणि परकीय इतिहास आणि पौराणिक कथांची अधिक माहिती - आमचा त्यांचा इतिहास

२. मराठी भाषा, बोलीभाषा, वाक्प्रचार, म्हणी, शब्दांच्या व्युत्पत्ती आदि विषयांवर रंजक माहिती - आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने...

३. उपक्रम या संकेतस्थळाविषयीचा समुदाय - उपक्रम!

४. खगोलशास्त्र आणि अवकाशविज्ञान या विषयावरील माहितीचे येथे संकलन व्हावे आणि त्यायोगे आपल्या सर्वांचेच ज्ञान वाढावे यासाठी हा समुदाय - खगोलशास्त्र आणि अवकाशविज्ञान

५. मराठीत गणिताची वर्धिष्णू ज्ञानगंगा आणणारा समुदाय - गणित

६. हा समुदाय भारतीय पारंपारिक ज्योतिषात रस असणाऱ्यांसाठी आहे. - ज्योतिषशास्त्र

७. नव्या तंत्रज्ञानाची ओळख, तंत्रज्ञानविषयक चर्चा, महिती, लेख आणि अनुभव - नवे तंत्रज्ञान

८.पऱ्यावरण, पऱ्यावरणाचे संरक्षण, संवर्धन यांच्याविषयी माहिती, चर्चा आणि उपक्रमांना वाहिलेला समुदाय - पऱ्यावरण

९. विश्वजालावर मराठीचे स्थान बळकट व्हावे अशी इच्छा असणाऱ्यांसाठी समुदाय - मराठी विश्वजाल तंत्रज्ञान

१०. मराठी साहित्यातील उत्तमोत्तम गोष्टींचा मागोवा घेणारा समुदाय - मराठी साहित्य

११.आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांबद्दल आपल्या मनातले पडसाद... राजकारण - समाजकारण

१२.वाहनांची निगा, दुरुस्ती, वाहनांतील बाजारात नवे आलेले प्रकार,वाहन सुरक्षेसंबंधी कायदे याबद्दल लेखन आणि चर्चा - वाहने: आपली व बाजारातली

१३. वैद्यकशास्त्राच्या सर्व शाखांसाठी एकत्रित समुदाय - वैद्यकशास्त्र

१४.विविध प्रांतात अग्रेसर ठरलेल्या,असणाऱ्या व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाचा,जीवनाचा मराठीतून परिचय करून देणारा समुदाय - व्यक्ती आणि वल्ली

१५.संस्कृत भाषा, संस्कृत साहित्य आणि संस्कृत भाषेशी निगडीत सर्व विषयांवर लेखन आणि चर्चा - संस्कृत

१६. प्रवास आणि भटकंतीचा धांडोळा घेणारांसाठी - सारे प्रवासी घडीचे!

१७.विविध भाषांमधील, विविध देशांतील चित्रपट, कलाकार, तंत्रज्ञ, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक यांना वाहिलेला आस्वादात्मक समुदाय - सेल्युलॉइड

१८. हिंदुस्थानी रागदारी संगीताला वाहिलेला समुदाय - हिंदुस्थानी रागदारी संगीत


बाह्य दुवे[संपादन]