उद्धव भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उद्धव भोसले[१] हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. शिक्षणतज्ज्ञ, प्रशासक आणि अभियंता ही त्यांची ओळख आहे. आपल्या एक वर्षाच्या काळात कुलगुरू म्हणून उद्धव भोसले यांनी विद्यापीठाला गतिमान प्रशासन दिले आहे.[ संदर्भ हवा ]

वैयक्तिक जीवन[संपादन]

डॉ. उद्धव व्यंकटराव भोसले यांचा जन्म २४ जानेवारी १९६७ रोजी झाला.[२]

शैक्षणिक जीवन आणि अध्यापन[संपादन]

डॉ उद्धव भोसले यांनी १९८९ मध्ये श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, नांदेड येथून इलेक्ट्रॉनिक्स या विषयात बी. ई. तर १९९५ मध्ये आपले पदव्युत्तर शिक्षण (एम. ई.) पूर्ण केले. बी. ई. नंतर भोसले यांनी काही काळ महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड येथे अध्यापनाचे कार्य केले. त्यानंतर त्यांनी आय. आय. टी. मुंबई येथून २००४ मध्ये पीएच. डी. ही पदवी प्राप्त केली.[३] नंतर भोसले यांनी आय.आय.टी. मधील संशोधन प्रकल्पावर काम केले. रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे प्राचार्य पदावर दोन वर्षे काम केले. त्यानंतर राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे प्राचार्य पदावर २००७ साली त्यांची नियुक्ती झाली. अशाप्रकारे त्यांना १४ वर्षाचा प्रशासनाचा अनुभव प्राप्त झाला.[४] नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यपीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली.[५]

मुंबई येथील राजीव गांधी इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य म्हणून भोसले यांची कारकीर्द अत्यंत प्रभावी राहीली. याच काळात मुंबई विद्यापीठ, मुंबईच्या विद्वत परिषदेचे ते सदस्य होते.[ संदर्भ हवा ]

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त नियतकालीकांतून त्यांचे शंभरपेक्षा अधिक शोध आलेख प्रकाशित झाले आहेत.[ संदर्भ हवा ] ए.डी. सायंटिफिक इंडेक्स या संस्थेने २१५ देशातील ११२ विषयातील शास्त्रांच्या ५ वर्षांचा अभ्यास करून त्यातून भोसले यांना उत्कृष्ट शास्त्रज्ञ असा बहुमान २०२२ साली दिला[६]

कुलगुरू म्हणून कार्य[संपादन]

पहिल्या दिवसापासून उद्धव भोसले यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत अव्याहत कार्य करणारे कुलगुरू म्हणून डॉ उद्धव भोसले यांनी आपला ठसा निर्माण केला.[ संदर्भ हवा ]

हरित विद्यापीठ परिसराच्या निर्मितीसाठी त्यांनी विशेष प्रयात्न केले. जल पुनर्भरणासाठी शेततळ्यांची निर्मिती केली, हजारो रोपांचे रोपण केले.[ संदर्भ हवा ]

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रत्येक गुरुवार 'नो व्हेईकल डे' म्हणून पाळला जातो. या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे श्रेय डॉ उद्धव भोसले यांना जाते.[ संदर्भ हवा ]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Udhav Bhosle - Google Scholar Citations". scholar.google.com. 2020-01-09 रोजी पाहिले.
  2. ^ "स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. उद्धव भोसले". पोलीसनामा (Policenama) (इंग्रजी भाषेत). 2020-01-09 रोजी पाहिले.
  3. ^ VICE CHANCELLOR pdf
  4. ^ "Dr. Uddhav Bhosale -". NandedOnline.com. Archived from the original on १९ एप्रिल २०२२.
  5. ^ http://www.srtmun.ac.in/en/about-srtmun/officers-of-the-university/vice-chancellor.html
  6. ^ https://web.archive.org/web/20220419065427/https://epaper.lokmat.com%2Farticlepage.php%3Farticleid%3DLOK_HNAN_20220419_1_12. Archived from [http%3A%2F%2Fepaper.lokmat.com%2Farticlepage.php%3Farticleid%3DLOK_HNAN_20220419_1_12 the original] Check |दुवा= value (सहाय्य) on १९ एप्रिल २०२२. Missing or empty |title= (सहाय्य)