उग्रश्रव सौती हा महाभारताचा सूत्रधार आहे. सौती एक सूतपुत्र ब्राम्हण होता. त्यांच्या वडिलांचे नाव लोमहर्षण. महाभारताची सुरुवात उग्रश्रवाच्या नैमिशारण्यात येण्याने होते. त्यानंतरचे संपूर्ण महाकाव्य उग्रश्रवाने शौनक या ब्राम्हण ऋषीस व शौनकाच्या गुरुकुलातील इतर ऋषींना सांगितले असे महाभारताचे स्वरूप आहे.