ईशा अग्रवाल
Appearance
ईशा अग्रवाल (जन्मः लातूर (महाराष्ट्र, भारत), २४ मार्च, १९८९ - ) ही भारतीय मॉडेल व अभिनेत्री असून१४ सप्टेंबर २०१७ रोजी मॉस्को, रशिया येथे पार पडलेल्या माईलस्टोन मिस ग्लोबल इंटरनॅशनल पॅजीएंट या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची विजेती आहे[१]. या पूर्वी तिने मिस इंडिया एक्झीक्युइस्ट २०१५ हा किताब मिळवलेला आहे[२].
शिक्षण
[संपादन]ईशाचे शालेय शिक्षण लातूर येथील कृपा सदन कॉन्व्हेंट स्कुल येथे झाले. पुढे चालून तिने सिम्बॉयसिस महाविद्यालय, पुणे येथून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तसेच तिने व्ही.एल.सी.सी. येथून न्यूट्रीशियन कोर्स पूर्ण केला.
कौटुंबिक माहिती
[संपादन]ईशाचे वडील हे लातूर येथील प्रसिद्ध व्यापारी आहेत.
कारकीर्द
[संपादन]- १४ सप्टेंबर २०१७ रोजी मॉस्को, रशिया येथे पार पडलेल्या माईलस्टोन मिस ग्लोबल इंटरनॅशनल पॅजीएंट या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची विजेती [१]
- फेब्रुवारी २०१७, थायलंडमध्ये मध्ये झालेल्या माईलस्टोन मिस इंडिया इंटरनॅशनलची विजेती[३]
- २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय एक्झीक्युइस्ट पॅजीएंटसाठी यूएसए मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि मिस फोटोजेनिक क्वीन हा किताब पटकावला
- मिस इंडिया एक्झीक्युइस्ट २०१५ विजेती[२]
- २०१४ मध्ये पार पडलेल्या मिस एसआयसीसी पुणेची विजेती
- इंडिया एक्झीक्युइस्ट पॅजीएंटची राज्य संचालक म्हणून काम केले
- २६ जानेवारी २०१८, सोनेरी महाराष्ट्र राइजिंग स्टार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त
- मार्च २०१८, कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार प्राप्त
- फेब्रुवारी २०१८, रोटरी क्लब ऑफ पुणे तर्फे रणरागिणी पुरस्कार प्राप्त
- जानेवारी २०१८, अखिल भारतीय अग्रवाल संमेलन येथे मुंबई आयकॉन पुरस्कार प्राप्त
- जून २०१७ मध्ये कॅलिफोर्निया येथे झालेल्या मिस नेपाळ कॅलिफोर्निया या स्पर्धेची परीक्षक
- अनेक चित्रपटातून अभिनय केला आहे[४]
- सध्या मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून मुंबई व पुणे येथे कार्यरत