इस्माइल उमर गुलेह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Ismail Omar Guelleh (es); Ismail Omar Guelleh (hu); እስማኤል ኦማር ገለህ (am); Ισμαήλ Ομάρ Γκουέλεχ (el); Ismail Omar Guelleh (ast); Ismail Omar Guelleh (ca); Ismail Omar Guelleh (tr); Ismaïl Omar Guelleh (de); Ismail Omar Guelleh (sv); Ісмаіл Амар Геле (be); اسماعیل عمر غیله (fa); 伊斯梅尔·奥马尔·盖莱 (zh); Ismail Omar Guelleh (da); Ismaïl Omar Guelleh (ro); イスマイル・オマル・ゲレ (ja); Ismail Omar Guelleh (gl); Ismaaciil Cumar Geelle (so); اسماعيل عمر جيلى (arz); اسماعیل عمر غیله (ps); אסמאעיל עומאר גואלה (he); Ismail Omar Guelleh (la); Исмоил Умар Гелле (tg); Ismail Omar Guelleh (io); Ismaïl Omar Guelleh (tay); 이스마일 오마르 겔레 (ko); اسماعيل عمر ڭيليه (ary); Ismail Omar Guelleh (eo); Ismaïl Omar Guelleh (cs); Ismail Omar Guelleh (pap); Ismail Omar Guelleh (it); ইসমাইল ওমার গুয়েল্লে (bn); Ismail Omar Guelleh (fr); Исмаил Омар Гелле (ru); Ismail Omar Guelleh (et); Ismail Omar Guelleh (fi); Ismaïl Omar Guelleh (nl); Ismaïl Omar Guelleh (nb); Ismail Omar Guelleh (pl); इस्माइल उमर गुलेह (mr); Ismail Omar Guelleh (id); Ismaïl Omar Guelleh (pt); Ісмаїл Омар Гелле (uk); Ismaïl Omar Guelleh (vi); Ismaïl Omar Guelleh (af); Ismail Omar Guelleh (lt); Ismaïl Omar Guelleh (sl); ისმაილ ომარ გელე (ka); Ismaïl Omar Guelleh (pt-br); Ismaïl Omar Guelleh (sco); อิสมาอีล อูมาร์ เกลเล (th); Ismaïl Omar Guelleh (sw); ഇസ്മാഈൽ ഒമർ ഗുഅല്ലെ (ml); İsmayıl Ömər Cəlil (az); اسماعیل عمر جلیہ (ur); Ismail Omar Guelleh (yo); Ismaïl Omar Guelleh (nn); Ismaïl Omar Guelleh (tum); Ismail Omar Guelleh (en); إسماعيل عمر جيلي (ar); Ismail Omar Guelleh (br); Ismail Omar Guelleh (oc) presidente de Yibuti (es); homme d'État djiboutien (fr); políticu francés (ast); President de Djibouti (ca); जिबूतीचे राष्ट्रपती (mr); dschibutischer Politiker, zweiter Präsident von Dschibuti (de); 2° presidente do Djibouti (pt); سياسي من دجيبوتي (ary); Amanyɔni (tw); Presiden Djibouti (1999-sekarang) (id); France siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); Cibuti devlet başkanı (tr); ジプチの大統領 (ja); נשיא ג'יבוטי המכהן (he); madaxweynaha jabuuti (so); سياسى من جيبوتى (arz); prezydent Dżibuti (pl); djiboutisk politiker (nb); politicus uit Djibouti (nl); politico gibutiano (it); 2-й Президент Джибуті (uk); președinte al statului Djibouti (ro); dzsibuti politikus (hu); President of Djibouti (1999-present) (en); سياسي جيبوتي (ar); prezident Džibutska (cs); politiko franses (pap) İsmail Omar Guelleh (tr); Ismaël Omar Guelleh, Ismaël Omar Guellleh, Ismaïl Omar Guelleh (fr); Guelleh, Ismail Omar (sv); איסמאעיל עומר ג'וילה (he); Ismail Omar Guelleh (nl); Ismail omar guelleh (pt); Ismaïl Omar Guelleh (yo); Ismail Omar Guelleh (de); 이스마엘 오마르 괼레, 이스마일 우마르 겔레 (ko); Ismaël Omar Guelleh (la); ისმაილ ომარ გელეჰი (ka); Ismail Omar Guelleh (nb); Ismaïl Omar Guelleh (es)
इस्माइल उमर गुलेह 
जिबूतीचे राष्ट्रपती
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावإسماعيل عمر جيله
जन्म तारीखनोव्हेंबर २७, इ.स. १९४७
डिरे दावा
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
  • People's Rally for Progress
पद
  • President of Djibouti (इ.स. १९९९ – )
वैवाहिक जोडीदार
  • Kadra Mahamoud Haid
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

इस्माइल उमर गुलेह (जन्म: २७ नोव्हेंबर १९४७) हे ८ मे १९९९ पासून जिबूतीचे सध्याचे राष्ट्रपती आहेत.

१९७७ मध्ये स्वातंत्र्यानंतर जिबूतीवर राज्य करणाऱ्या आपल्या काका हसन गोलेड अप्टिडॉन यांनी गुलेहला उत्तराधिकारी म्हणून निवडले. इ. स. १९९९ मध्ये ते पहिल्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. २००५, २०११ आणि पुन्हा २०१६ मध्ये पुन्हा गुलेह निवडून आले. २०११ च्या निवडणुकीत व्यापक अनियमिततेच्या तक्रारींवरून विरोधकांनी मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकला होता. गुलेह एक हुकूमशहा म्हणून वैशिष्ट्यीकृत आहेत, आणि त्यांच्या नियमांवर काही मानवी हक्कांच्या गटांनी टीका केली आहे.

येमेनमधून भारतीय नागरिकांच्या सुरक्षित बाहेर काढण्याच्या भूमिकेबद्दल २०१९ मध्ये त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.[१]

पार्श्वभूमी[संपादन]

गुलेह यांचा जन्म दिर इसा कुळातील राजकीयदृष्ट्या शक्तिशाली मामासन उपकुळामध्ये १७ नोव्हेंबर १९४७ला झाला. इथिओपियातील डायर दावा हे त्यांचे जन्मगाव आहे. गुलेह लहान असताना त्यांनी पारंपारिक इस्लामिक शाळेत शिक्षण घेतले. १९६० च्या उत्तरार्धात, गुलेह हायस्कूल शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी जिबूती येथे गेले. नंतर ते कनिष्ठ नॉन-कमिश्ड अधिकारी बनून पोलिसात रुजू झाला. १९६८ मध्ये त्यांनी सेवेत प्रवेश केला. जिबूती स्वतंत्र झाल्यानंतर, ते काका हसन गोलेड अप्टिडॉन यांच्या सरकारमध्ये गुप्त पोलीस प्रमुख आणि मंत्रिमंडळाचे प्रमुख झाले. त्यांनी सोमाली राष्ट्रीय सुरक्षा सेवेचे आणि त्यानंतर फ्रेंच सिक्रेट सर्व्हिस कडून प्रशिक्षण घेतले. ते काकांचे वारसदार होणार असे गृहित धरले होते.

राष्ट्रपती[संपादन]

४ फेब्रुवारी १९९९ रोजी, राष्ट्रपती हसन गोलेड अप्टिडॉन यांनी घोषणा केली की ते पुढील निवडणुकीच्या वेळी निवृत्त होतील आणि त्यांच्या पक्षाच्या एका असाधारण काँग्रेस बैठकीने, सत्तारूढ पीपल्स रॅली फॉर प्रोग्रेस (आरपीपी) यांनी गुलेह यांना अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडले. आरपीपीचे आणि फ्रंट फौर रिस्टोरेशन ऑफ युनिटी अँड डेमोक्रसी (एफआरयूडी)च्या मोर्च्याचे संयुक्त उमेदवार म्हणून, ९ एप्रिल १९९९ रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत गुलेह यांनी आपला एकमेव प्रतिस्पर्धी, स्वतंत्र उमेदवार (मौसा अहमद इद्रीस) पराभूत करून ७४.०२% मताधिक्याने जिंकला. ८ मे रोजी त्यांनी पदभार स्वीकारला.

पुढे, सशस्त्र दलाचे मनोबल धोक्यात आणल्याबद्दल पुढील सप्टेंबर १९९९ मध्ये मौसा अहमद इद्रीस यांना अटक करण्यात आली आणि अज्ञातस्थानावर ताब्यात घेण्यात आले. डिसेंबर २००० मध्ये, गुलेहने राष्ट्रीय पोलीस दलातील प्रमुख, यासिन याबेह यांना काढून टाकले. यासिनच्या निष्ठावान पोलिसांनी त्याला काढून टाकल्यानंतर अयशस्वी बंडखोरी केली.

गुलेह यांना ७ ऑक्टोबर २००४ रोजी आरपीपीने दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. पक्षाच्या एका असाधारण काँग्रेस बैठकीमध्ये हा ठराव झाला. त्यांना इतर अनेक पक्षांनी पाठिंबा दर्शविला होता. ८ एप्रिल २००५ रोजी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ते एकमेव उमेदवार होते. प्रतिस्पर्धी नसतांना त्यांनी १००% मत जिंकले आणि दुसऱ्या सहा वर्षाच्या कार्यकाळात शपथ घेतली. ७ मे २००५ रोजी ते म्हाणाले की हा त्यांचा शेवटचा कार्यकाळ असेल.

तथापि, २०१० मध्ये, गुलेह यांनी जिबूतीच्या नॅशनल असेंब्लीला देशाच्या घटनेत बदल करण्यास भाग पाडले आणि ते तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदासाठी उभे राहिले.[२] २०११ च्या जिबूतीच्या निवडणुकीत मतदानावर आपले नाव ठेवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. २०१० मध्ये अरब देशातील लोकशाहीच्या मोठ्या चळवळीप्रमाणेच येथे पण मोठ्या निषेधांचे प्रतिसाद उठले. पण हा निषेध त्वरीत खाली दाबण्यात आला. विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात केवळ एक अल्पज्ञात उमेदवार मतपेटीवर सोडून निवडणुकीवर बहिष्कार टाकला. गुलेह जवळजवळ ८०% मते जिंकली.[३] मतदानापूर्वी विरोधी पक्ष नेत्यांना दोनदा तुरूंगात डांबले गेले असेल तर ही निवडणूक रास्त म्हणता येईल का, असा प्रश्न उपस्थित केला गेला.

गुलेहयांनी पुन्हा सांगितले की आपण परत पदासाठी निवडणूक लढणार नाही. पण २०१६ च्या निवडणुकीत जवळपास ८७% लोकप्रिय मताधिक्याने गुलेह जिंकले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "प्रसिद्धिपत्रक, २०१९" (PDF). २५ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
  2. ^ "Djibouti lawmakers remove term limits", Reuters, April 11, 2010.
  3. ^ "Djibouti: President Ismael Omar Guelleh wins third term", BBC News, April 9, 2011.