इंदिरा बॅनर्जी
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर २४, इ.स. १९५७ कोलकाता | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
| |||
इंदिरा बॅनर्जी ह्या भारतीय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात त्या ८व्या महिला न्यायाधीश ठरल्या आहेत.[१] यापूर्वी त्या मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होत्या. [२] या पदावर राहणाऱ्या दुसऱ्या महिला होत्या.[३]
प्रारंभिक जीवन
[संपादन]इंदिरा बॅनर्जी यांचा जन्म २४ सप्टेंबर १९५७ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोलकाता येथील लॉरेटो हाऊसमध्ये केले. त्यांनी कोलकाताच्या प्रेसिडेन्सी कॉलेज आणि कायदा विभाग, कलकत्ता विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले.[४] ५ जुलै १९८५ रोजी त्या वकील म्हणून दाखल झाल्या आणि कलकत्ता उच्च न्यायालयात प्रशिक्षण घेतले.[५]
न्यायालयीन कारकीर्द
[संपादन]इंदिरा बॅनर्जी यांची ५ फेब्रुवारी २००२ रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि ८ ऑगस्ट २०१६ पासून दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली. त्यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली,[६] आणि ५ एप्रिल २०१७ रोजी पदभार स्वीकारला.[७][८]
न्यायमूर्ती बॅनर्जी यांनी न्यायाधीश संजय किशन कौल यांच्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयात स्थान देण्यात आले.[९] न्यायमूर्ती कांता कुमारी भटनागर[१०] नंतर जून ते नोव्हेंबर १९९२ दरम्यान न्यायालयाचे नेतृत्व करणाऱ्या सनदी उच्च न्यायालयाच्या प्रमुख होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत.[११][१२] ७ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली.
संदर्भ
[संपादन]- ^ "Indira Banerjee elevated".
- ^ Gambhir, Ashutosh (3 April 2017). "Justice Indira Banerjee bids farewell to Delhi High Court, third judge to leave in 5 days". Barandbench.com.
- ^ "Indira Banerjee appointed Chief Justice of Madras High Court". Thehindu.com.
- ^ "Madras High Court". Hcmadras.tn.nic.in.
- ^ "Justice Indira Banerjee sworn-in as Chief Justice of Madras HC". Thehindubusinessline.com. 5 April 2017.
- ^ "Justice Indira Banerjee Appointed As CJ Of Madras HC,12 Addl. HC Judges Made Permanent - Live Law". Livelaw.in. 31 March 2017.
- ^ "Indira Banerjee sworn in HC Chief Justice". Thehindu.com.
- ^ "Indira Banerjee sworn in Chief Justice". Thehindu.com.
- ^ Venkateshan, J. "Indira Banerjee to be next CJ of Madras High Court". Decaanchronicle.com.
- ^ "Former Madras CJ passes away". Thehindu.com.
- ^ "Indira Banerjee appointed CJ of Madras High Court". Thehindu.com.
- ^ "Madras High Court". Hcmadras.tn.nic.in. 12 February 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 June 2017 रोजी पाहिले.