इंदर सिंह नामधारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इंदर सिंह नामधारी (जन्म: सप्टेंबर १०, इ.स. १९४२) हे जनता दल (संयुक्त) पक्षाचे माजी नेते आहेत. ते इ.स. १९९७ पर्यंत लालूप्रसाद यादव यांचे समर्थक होते पण त्यानंतर त्यांचे लालू यादव यांचे बरोबर मतभेद झाले. त्यानंतर ते इ.स. २००० ते इ.स. २००६ या काळात जनता दल (संयुक्त) चे उमेदवार म्हणून झारखंड विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांचे पक्षाच्या नेतृत्वा बरोबर मतभेद झाल्यामुळे त्यांनी इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत झारखंड राज्यातील चत्रा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले.[ संदर्भ हवा ]