इंग्लंडचा राजा आणि त्याचे तीन पुत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंडचा राजा आणि त्याचे तीन पुत्र
द कॅसल ऑफ मेलव्हेल (जॉन डी. बॅटन द्वारा)
लोककथा
नाव इंग्लंडचा राजा आणि त्याचे तीन पुत्र
इतर नावे एक म्हातारा राजा आणि त्याचे इंग्लंडचे तीन पुत्र
माहिती
आर्ने-थॉम्पसन वर्गीकरण प्रणाली एटीयु ५५१
उगम रोमानी
देश इंग्लंड

इंग्लंडचा राजा आणि त्याचे तीन पुत्र ही एक रोमानी परीकथा आहे. ती जोसेफ जेकब्सने मोअर इंग्लिश फेयरी टेल्समध्ये संग्रहित केलेली आहे. त्याने त्याचा स्रोत फ्रान्सिस हिंड्स ग्रुम्स इन जिप्सी टेंट म्हणून सूचीबद्ध केला होता. जिथे माहिती देणारा जॉन रॉबर्ट्स, एक वेल्श रोमा होता.[१] ग्रुमने इंग्लंडमधील एक जुना राजा आणि त्याचे तीन पुत्र नावाने कथा प्रकाशित केली.[२]

या कथेची आवृत्ती द रेड किंग अँड द विच: जिप्सी फोक अँड फेयरी टेल्स लिखित रुथ मॅनिंग-सँडर्स, एन ओल्ड किंग अँड हिज थ्री सन्स ऑफ इंग्लंड या शीर्षकाखाली दिसते.

सारांश[संपादन]

एकदा एक म्हातारा राजा दूरच्या देशात असलेल्या सोन्याच्या सफरचंदांनीच बरा होऊ शकणार असतो. त्याचे तीन पुत्र त्या सफतचंदाना शोधण्यासाठी निघतात. एका चौकात येऊन ते वेगवेगळे होतात. धाकट्या मुलाला जंगलात एक घर दिसले, तिथे एका म्हाताऱ्याने त्याचा राजाचा मुलगा म्हणून सन्मान करते. त्याला सांगते की आपला घोडा तबेल्यात ठेव आणि काहीतरी खा. जेवणानंतर, तो मुलगा विचारतो की तो राजाचा मुलगा आहे हे त्याला कसे कळले? त्यावर तो सांगते की त्याला राजकुमार काय करत आहे यासह अनेक गोष्टी माहित आहेत. तो राजकुमाराला रात्री तिथेच राहावे असे सुचवतो. तो त्याला बजावतो की रात्री बरेच साप आणि टॉड त्याच्या अंगावर रेंगाळतील. जर तो हलला तर त्याचे रुपांतर त्याचे प्राण्यांमध्ये होईल.

राजपुत्राला थोडी झोप लागते. रात्री तो बिल्कुल हलत नाही. सकाळी, म्हाताऱ्याने त्याला नाश्ता, नवीन घोडा आणि रस्ता दाखवण्यासाठी सुताचा गोळा देतो. जेव्हा राजपुत्राने तो गोळा फेकून त्याचा पाठलाग करतो तेव्हा तो त्या म्हाताऱ्याच्या भावाकडे पोहचतो. जो पहिल्या म्हाताऱ्यापेक्षा कुरूप होता. त्याला तोच आदरातिथ्य आणि तीच अप्रिय रात्र मिळते आणि तो भाऊ त्याला तिसऱ्या भावाकडे पाठवतो.

तिसरा भाऊ, जो दुसऱ्या भावापेक्षाही कुरूप होता, त्याला सांगितो की त्याला वाड्यात जावे लागेल. तेथे, त्याने तिथल्या हंसांना तलावावर घेऊन जावे. त्या हंसांचे रक्षण राक्षस, सिंह आणि ड्रॅगन करत असतात. परंतु ते झोपलेले असतील आणि म्हणून त्याने एक वाजता आत जावे आणि दोन वाजता पुन्हा बाहेर यावे. त्याने काही भव्य खोल्यांमधून जावे, स्वयंपाकघरात जावे आणि नंतर बागेत जावे. तेथे त्याने सफरचंद उचलले पाहिजेत. त्याने आल्या त्याच मार्गाने परत यावे. परत येताना त्याने मागे वळून पाहू नये. कारण तसे केल्यास ते प्राणी म्हाताऱ्याच्या घरी पोहोचेपर्यंत त्याचा पाठलाग करतील.

तो झोपायला जातो. यावेळी भावाने त्याला आश्वासन दिले की त्याला काहीही त्रास होणार नाही. आणि तसेच होते. सकाळी, वृद्ध माणसाने त्याला एका सुंदर स्त्री भेटली तरी थांबू नको असे बजावतो.

तो राजहंसाने वाड्यात पोहोचतो आणि तिथे एक सुंदर स्त्री दिसते. तो तिचे गार्टर, सोन्याचे घड्याळ आणि खिशात रुमाल बदलून तिचे चुंबन घेतो. मग त्याला सफरचंदही मिळते. ते घेऊन तो वेगाने पळून जातो. कारण तास जवळ जवळ संपत आलेला असेतो. अखेर तो निसटतो.

म्हातारा त्याला एका विहिरीजवळ आणतो आणि त्याला संगतो की म्हाताऱ्याचे डोके कापून विहिरीत टाक. तो तसे करतो. यामुळे तो म्हातारा एक तरुण, देखणा माणूस बनतो. त्याचे घर एका राजवाड्यात बदलते . हिच गोष्ट तो दुस-या आणि तिसऱ्या भावा बरोबर देखील करतो.

परत येताना तो पुन्हा आपल्या भावांना भेटतो. त्याचे भाऊ त्याची सफरचंद चोरतात आणि त्यांच्या जागी इतर सफरचंदे ठेवतात. जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा त्याची सफरचंद त्याच्या भावासारखी चांगली नसतात. त्यामुळे त्याच्या वडिलांना वाटते की त्यांना विष दिले जात आहे. त्यामुळे ते सेनापतीला त्याचे डोके उडवण्यास सांगतात. त्याऐवजी सेनापती त्याला जंगलात घेऊन जातो आणि तेथेच सोडून देतो. जंगलात एक अस्वल त्याच्याकडे येते. ते पाहून तो एका झाडावर चढतो. पण अस्वल त्याला खाली येण्यास सांगतो. अस्वल त्याला एका तंबूत घेऊन जातो. जिथे त्याचे स्वागत केले जाते. त्या अस्वलाचे रुपांतर एका जुबाल नावाच्या देखण्या तरुणात होते. त्याला जाणवते की त्याचे सोन्याचे घड्याळ कुठेतरी हरवले आहे. एके दिवशी त्याला आठवते की, अस्वलापासून लपण्यासाठी ज्या झाडावर तो चढला होता त्याच झाडावर त्याला ते दिसते आणि ते घेण्यासाठी पुन्हा तो त्या झाडावर चढतो.

दरम्यान, त्याला भेटलेली राजकन्या त्याला भेटण्यासाठी सैन्य घेऊन येते. जेव्हा ती राजाकडे पोहोचते तेव्हा ती राजकुमाराला भेटण्याची मागणी करते. तीला सर्वात मोठा मुलगा भेटतो. ती ओळखण्यासाठी तिचा रुमाल जमिनीवर टाकते. जेव्हा मोठा राजकुमार त्यावर पाय ठेवतो तेव्हा त्याचा पाय मोडतो. दुसऱ्या राजकुमाराबरोबरही हेच घडते. ती राजाला सांगते की हा तो राजकुमार नाही ज्याला ती शोधत आली होती. राजाला खरी गोष्ट उमजते. राजा तीला सेनापतीकडे पाठवतो. त्यावेळेस तो कबूल करतो की त्याने पण राजकुमाराला मारले नाही आणि जंगलात सोडून दिले होते. राजा सेनापतीला सांगतो की प्राण वाचवायचे असतील तर राजकुमारला शोधून घेऊन ये. सेनापतीला जुबाल सापडतो. जुबाल त्यांना राजकुमार असेलेल्या झाडाकडे घेऊन जातो. राजकुमाराला संगतो की त्याने खाली यायलाच हवे कारण एक स्त्री त्याला शोधत आहे. राज्कुमारी परत रुमाल जमिनीवर टकते. राजकुमार त्यावर उभा राहतो, परंतु त्याचा पाय मोडत नाही. राजकुमारी त्याला ओळखते की तोच तिचा राजकुमार आहे. मग ते लग्न करतात आणि तिच्या वाड्यात परत जातात.

विश्लेषण[संपादन]

कथा प्रकार[संपादन]

आंतरराष्ट्रीय आर्ने-थॉम्पसन-उथर इंडेक्समध्ये या कथेचे वर्गीकरण एटीयु ५५१, "द सन्स ऑन अ क्वेस्ट फॉर अ वंडरफुल रेमेडी फॉर त्‍यांच्‍या वडिलांसाठी" किंवा "वॉटर ऑफ लाईफ" असे केले आहे. या कथेचा प्रकार एका राजाशी संबंधित आहे जो मरणार आहे किंवा आंधळा होणार आहे आणि त्याला बरे करणारी एकमेव गोष्ट शोधण्यासाठी त्याच्या तीन मुलांना पाठवतो.[३][४]

रुपांतर[संपादन]

इंग्रजी कादंबरीकार अ‍ॅलन गार्नर यांनी त्यांच्या अ‍ॅलन गार्नरच्या बुक ऑफ ब्रिटीश परीकथा या पुस्तकात द कॅसल ऑफ मेलव्हॅलेस या कथेचे रुपांतर केले. त्याच्या आवृत्तीत राजकुमारांची नावे ऑलिव्हर, व्हॅलेंटाईन आणि जॅक आहेत.[५]

हे देखील पहा[संपादन]

  • निल्स आणि दिग्गज
  • ठळक नाइट, तरुणपणाचे सफरचंद आणि जीवनाचे पाणी
  • ग्रीन ग्लेनचे तपकिरी अस्वल
  • गोल्डन बर्ड
  • एरिनचा राजा आणि एकाकी बेटाची राणी
  • द रायडर ऑफ ग्रॅनाइग आणि इयान द सोल्जर सन
  • जीवनाचे पाणी
  • Ibong Adarna
  • परी अरोरा

संदर्भ[संपादन]

  1. ^ Joseph Jacobs, More English Fairy Tales, "The King of England and his Three Sons" Archived 2010-04-27 at the Wayback Machine.
  2. ^ Groome, Francis Hindes. Gypsy Folk-Tales. London: Hurst & Blackett. 1899. pp. 220-232.
  3. ^ Aarne, Antti; Thompson, Stith. The types of the folktale: a classification and bibliography. Folklore Fellows Communications FFC no. 184. Helsinki: Academia Scientiarum Fennica, 1961. pp. 195, 197.
  4. ^ Uther, Hans-Jörg (2004). The Types of International Folktales: A Classification and Bibliography, Based on the System of Antti Aarne and Stith Thompson. Suomalainen Tiedeakatemia, Academia Scientiarum Fennica. pp. 320–321. ISBN 978-951-41-0963-8.
  5. ^ Garner, Alan. Alan Garner's Book of British fairy tales. New York: Delacorte Press, 1984. pp. 146-158, 160.