आसकंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आसकंद (इंग्रजीत Winter cherry; शास्त्रीय नाव Withania somnifera) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिला आस्कंद, अश्वगंधा, ढोरकामुनी, ढोरगुंज, कामरूपिनी या नावाने सुद्धा ओळखले जाते.

अश्वगंधा
फुल
फळ

आयुर्वेदिक उपचारांमधील ही महत्त्वाची वनस्पती आहे. हिला इंडिअन जिनसँग म्हणून ओळखले जाते. वृष्य व वाजीकर अशी ही वनस्पती आहे. हिच्या दोन जाती असतात.

  1. १.देशी- ही जंगलामध्ये आढळते.
  2. २. दुसरी- ही पेरणी करून उगविली जाते. हिच्या मुळांचा वापर आयुर्वेद चिकित्सेमध्ये केला जातो.

'बुढापे का सहारा अश्वगंधा विधारा।।' अशी एक म्हण प्रसिद्ध आहे.
ही एक लहान, कोमल बारमाही झुडूप आहे जी 35-75 सें.मी. पर्यंत उंच वाढते. हिच्या शाखा मध्यवर्ती खोडापासून चोहोबाजूला विस्तृत असतात. पाने गडद हिरव्या रंगाची, निस्तेज पांढरा रंग वरून लावल्या सारखी, लंबवर्तुळाकार असतात. पाने साधारणत: 10-12 सेमी (4 ते 5 इंच) लांब असतात. फुले लहान, हिरव्या आणि बेल (घंटा)आकाराचे असतात. पिकलेली फळे केशरी-लाल रंगाची असतात. या फळांना कामुन्या असे बोलीभाषेत म्हटलं जातं. प्रत्येक फळात अनेक छोटछोट्या बिया असतात. ही फळे पक्षी किटक आणि मुंग्या आवडीने खातात. बियांची उगवण क्षमता कमी असते. झाडाची मुळे 30-45 सेमी लांब, मुळा सारख्या, 2.5-3.5 सेमी जाड असतात. मुळांचा बाह्य रंग तपकिरी असून, आतून पांढरा असतो. या मुळ्यांचा उपयोग आयुर्वेदात प्रामुख्याने केला जातो.
मुळ्यातील रासायनिक घटक
अश्वगंधाच्या मुळांमध्ये अल्कॉइड्सची तीव्रता 0.13 ते 0.31 टक्के आहे. त्यात लक्षणीय व्हिडानिन अल्कालाईइड्स आहेत, जे एकूण अल्कधर्मीयांपैकी 35 ते 40 टक्के आहेत.

आढळ[संपादन]

आयुर्वेदिक उपयोग[संपादन]

लागवड[संपादन]

अश्वगंधा ची मोठ्या प्रमाणावर शेतीद्वारे लागवड केली जाते.

हे सुद्धा पहा[संपादन]