अश्वगंधा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अश्वगंधा

अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे.आयुर्वेद उपचारांमधील ही महत्त्वाची वनस्पती आहे. हिला इंडिअन जिनसँग म्हणून ओळखले जाते. वृष्य व वाजीकर अशी ही वनस्पती आहे. आहे. हिच्या दोन जाती असतात. १.देशी- ही जंगलामध्ये आढळते. २. दुसरी- ही पेरणी करून उगविली जाते. हिच्या मुळांचा वापर आयुर्वेदचिकित्सेमध्ये केला जातो. 'बुढापे का सहारा अश्वगंधा विधारा।।' अशी एक म्हण प्रसिद्ध आहे.

बकरीच्या मांसापासून तयार केलेला रस्सा व अश्वगंधा यांचा वापर करून बनवलेलेअजाअश्वगंधादि लेहम् नावाचे औषध आयुर्वेद चिकित्सेमधे वजनवर्धक व शक्तिवर्धक म्हणून वापरतात.

अश्वगंधाचे रसपंचक[संपादन]

  • रस - मधुर, तिक्त, कषाय
  • विपाक- मधुर
  • वीर्य- उष्ण
  • गुण- लघु, स्निग्ध
  • कर्म- शुक्र, बल्य