आशालता कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रा. आशालता लक्ष्मण कांबळे ह्या एक मराठी कवयित्री, लेखिका, समीक्षिका, वक्त्या व फुले-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. आमची आई हे त्यांचे आत्मचरित्र आहे.[१] त्या प्राध्यापिका आहेत. इ.स. १९७८पासून शिक्षण त्या क्षेत्रात आहेत, तर इ.स. १९८० पासून सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत. ॲडव्होकेट लक्ष्मण कांबळे हे आशाताईंचे पती होय.

आशालता कांबळे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

 • आमची आई (आत्मचरित्र, २०१०)
 • बहिणाबाईंच्या कविता: एक आकलन – या पुस्तकास डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल पुरस्कार, तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचा समीक्षेसाठी दिला जाणारा 'प्रभाकर पाध्ये पुरस्कार' मिळाला आहे.
 • यशोधरेची लेक (कवितासंग्रह) - यामधील कवितांचा मुंबई विद्यापीठाच्या पादव्युत्तर अभ्यासक्रमासाठी समावेश झालेला आहे.
 • समर्थ स्त्रियांचा इतिहास (२००९)

व्याख्याने व स्तंभलेखन[संपादन]

प्रा. आशालता कांबळे यांनी महाराष्ट्रात अनेक प्रबोधनात्मक व्याख्याने दिली आहेत. तसेच राज्यपातळीवरील आणि देशपातळीवरील अनेक परिषदांमध्ये सामाजिक विषयावरील शोधनिबंधांचे सादरीकरण केले आहे. थेरीगाथा, यशोधरा, रमाई, जिजाऊ, यांच्यावरील त्यांच्या व्याख्यानाच्या ध्वनिफिती प्रसिद्ध झाल्या आहेत. दैनिक 'सम्राट' आणि दैनिक 'महानायक' मधून त्यांनी दीर्घकाळ स्तंभलेखनसुद्धा केलेले आहे.[२]

पुरस्कार व सन्मान[संपादन]

 • मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार (२०१७)
 • अप्पासाहेब रणपिसे पुस्तक पुरस्कार
 • डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल पुस्तक पुरस्कार (सन २०००)
 • कल्याणच्या नालंदा दालन या संस्थेचा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार (२००४)
 • आशिया खंडातील कर्तृत्वान व्यक्तींचा परिचय करून देणाऱ्या 'हुज- हू' या दिल्लीतून नियमितपणे प्रकाशित होणऱ्याा सन २०१३च्या अंकात लेखिका म्हणून आशालता कांबळे यांच्या लेखनकर्तृत्वाची ओळख समाविष्ट करण्यात आली आहे.
 • कस्तुरी महिला भूषण पुरस्कार
 • कोकण मराठी साहित्य परिषदेचा प्रभाकर पाध्ये पुरस्कार (बहिणाबाईंच्या कविता: एक आकलन – या पुस्तकास, २००३)
 • कणकवलीच्या साहित्य दर्पण मंचाचा 'वामनदादा कर्डक साहित्य पुरस्कार' (२०१०)
 • सावित्रीबाई फुले फातिमा शेख पुरस्कार
 • समाजभूषण पुरस्कार
 • सोनबा येलवे वाचनालय पुरस्कार (२००३)

संदर्भ[संपादन]