Jump to content

अल्बुकर्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आल्फोन्सो आल्बुकर्क या पानावरून पुनर्निर्देशित)
अल्बुकर्क

अल्बुकर्क ( इ.स. १४५३ - मृत्यू: १६ डिसेंबर, इ.स. १५१५) हा भारतातील पोर्तुगीज वसाहतींचा इ.स. १५०९ ते १५१५ या कालखंडात व्हाइसराॅय होता.

कार्यकाळ

[संपादन]

अल्बुकर्क हा पोर्तुगीज आरमाराचा उपनौदलप्रमुख म्हणून इ.स. १५०६ साली भारतात आला. आल्यानंतर त्याने पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहतींचा पहिला व्हाइसराॅय अल्मेडा याच्याबरोबर अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. अल्मेडानंतर पोर्तुगीजांच्या भारतातील भूप्रदेशाचा व्हाइसराॅय म्हणून त्याने काम केले.

अल्बुकर्कने भारतातील जिंकलेल्या प्रदेशात मुलकी प्रशासन व्यवस्था सुरू केली. त्याने त्याच्या ताब्यातील खेड्यांना नागरी सुविधांसंबंधी धोरण राबविण्याचे स्वातंत्र्य दिले. महसूल गोळा करणे आणि फौजदारी खटले चालविण्यासाठी त्याने पोर्तुगीज अधिकारी नेमले.