आर्थर रिम्बॉ
Appearance
ज्यां निकोलस आर्थर रिम्बॉ (फ्रेंच: Jean Nicolas Arthur Rimbaud; २० ऑक्टोबर १८५४, शार्लव्हिल - १० नोव्हेंबर १८९१, मार्सेल) हा एक फ्रेंच कवी होता. रिम्बॉने अत्यंत तरुण वयामध्ये कविता लेखन सुरू केले व वयाच्या २१व्या वर्षी काव्यलेखन बंद केले. जगभर प्रवासाची आवड असलेला रिम्बॉ वयाच्या ३७व्या वर्षी कर्करोगने मृत्यू पावला.
रिम्बॉच्या काव्यशैलीचा प्रभाव विसाव्या शतकामधील पाब्लो पिकासो. डिलन थॉमस, व्लादिमिर नाबोकोव्ह, बॉब डायलन इत्यादी अनेक कलावंतांवर पडला होता.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत