आय.एन.एस. विराट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आय.एन.एस. विराट

आय.एन.एस. विराट ही भारतीय नौदलातील विमानवाहू युद्धनौका आहे. विराट या संस्कृत शब्दाचा अर्थ प्रचंड असा होतो. ती ब्रिटनच्या रॉयल नेव्हीमध्ये १८ नोव्हेंबर १९५९ साली दाखल झाली. रॉयल नेव्हीमध्ये ती एच.एम.एस. हर्मीस या नावाने ओळखली जात असे. नौदल उभारणीसाठी भारताने ब्रिटनकडून ती १९८७ साली विकत घेतली. भारतीय नौदल ताफ्याची ही अग्रणी ध्वजनौका(Flagship) आहे.

ही नौका आय.एन.एस. ज्योतीनंतरची भारतीय आरमारातील सगळ्यात मोठी नौका आहे.