आयुर्वेदातील दोषांची माहिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


आयुर्वेदातील दोषांबदल सविस्तर-  

आयुर्वेद हे भारतीय संस्कृतीने निर्माण केलेले प्राचीन शास्त्र आहे. भारतीय ऋषी मुनींनी जीवनाच्या सर्वांगाचा शास्त्रशुद्ध अभ्यास व संशोधन केले आहे.

आयुर्वेदा मध्ये तीन दोष मानलेले आहेत. 1. वायु 2. पित्त 3. कफ हे तीन दोष होत .  

"वायु पित्तं कफश्चेति त्रयो दोषाः समासतः "

पंचमहाभूतामधील जलतत्व कफ आहे, अग्नीतत्व पित्त आहे, आणि वायुतत्वच वात आहे .

हे तीन दोष विकूत म्हणजेच शरीराचा विनाश करते आणि अविकूत जीवनदान करतात.

हे तीन दोष समस्त शरीरात व्याप्त असतात तरीसुद्धा नाभि आणि हदयाच्या मध्ये पित्त आणि हदयाच्या वरती कफाचे स्थान आहे. म्हातारपणी वायु प्रकोप अधिक असतो. युवावस्था मध्ये पित्तचा प्रकोप अधिक असतो. तर बालपणी कफाचा प्रकोप अधिक असतो .अग्नी आणि पित्ताचे गुणधर्म समान असल्यामुळे पित्त दोष वाढल्यावर अग्नी तीक्ष्ण होते . तीन दोषांच्या गुणांचे वर्णन यात आहे -

रुक्ष,लघु, शीत,खर,हे वातदोषाचे गुण आहेत.

तर स्निग्ध, तीक्ष्ण, उष्ण, लघु हे गुण पित्ताचे आहेत .

स्निग्ध, शीत,गुरू, मन्द,हे कफाचे गुण आहेत .

अशाप्रकारे वायु, पित्त व कफ या तीन दोषांचे वर्णन यात केले आहे.