आयटीआर-१ सहज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आयटीआर –१ सहज अर्ज[संपादन]

प्रत्येक भारतीय नागरीकाला भारताच्या आयकर विभागाकडे आयकर दाखल करण्यासाठी आयटीआर-१ सहज हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. आयकर कायदा १९६१ आणि आयकर नियम १९६२ नुसार प्रत्येक भारतीय नागरीकाला प्रत्येक वित्तीय वर्षाच्या अखेरीस आयकर विभागाकडे आयकर दाखल करणे बंधनकारक आहे. हा परतावा ठराविक विहित मुदतीपूर्वी दाखल करण्यात येतो. हा अर्ज भारताच्या आयकर विभागाकडून दिला जातो आणि भारत सरकारच्या नियमामध्ये आयकर परतावा दाखल करण्याचा समावेश केलेला आहे. प्रत्येक आयकर परतावा अर्ज ठराविक कर निर्धारक व्यकतींना लागू आहे आणि आयटीआर-१ सहजच्या बाबतीतही, भारतीय आयकर विभागाकडून कर निर्धारण लागू असलेल्या व्यक्तींनी दाखल केलेल्या अर्जावर कार्यवाही होते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कोणत्या अर्जाची आवश्यकता लागणार आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. आयकर परतावा अर्ज करनिर्धारण व्यक्तीच्या उत्पन्नाच्या साधनावर आणि प्रकारावर अवलंबून आहे.

आयकर परतावा दाखल :- कायद्याने बंधनकारक[संपादन]

ज्या व्यक्ती खालील अटींची पूर्तता करतात, त्या वित्तीय वर्षामध्ये आयकर परतावा दाखल करु शकतात.

 • क्रेडीट कार्ड असल्यास.
 • स्वत्:च्या किंवा इतर व्यक्तीच्या परकीय प्रवासावर खर्च झाल्यास.
 • दूरध्वनी जोडणी असल्यास.
 • क्लबचा सभासद असल्यास.
 • जमीनीच्या क्षेत्रफळाची स्थावर मालमत्ता असल्यास.
 • स्वत्:च्या मालकीचे वाहन असल्यास.

दाखल करण्याची विहित मुदत[संपादन]

या वित्तीय वर्षामध्ये आयकर विभागाने मुदत दिलेली नसल्यास आयकर दाखल करण्याची विहित मुदत ३१ जुलै अखेरीस राहील. जसे वित्तीय वर्ष 2012-13 करीता आयकर दाखल करण्याची तारीख ३१ ऑगस्ट २०१२ अशी आहे.[१]

आयटीआर-१ सहज अर्ज लागू असणा-या व्यक्ती[२][संपादन]

ज्या व्यक्तींना एका वित्तीय वर्षामध्ये खालील माध्यामातून उत्पन्न मिळते त्यांनी आयटीआर-1 सहज हा अर्ज भरावयाचा आहे.[३]

 • वेतन किंवा निवृत्ती वेतन
 • एखादे घर मालकीचे असल्यास (मागील वर्षी त्या मालमत्तेचे नुकसान झालेले नसावे).
 • सोडत, घोडयांची शर्यत, कायदेशीर जुगार या व्यतिरिक्त इतर माध्यामातून उत्पन्न मिळत असल्यास.
 • संयुक्त आयकर परताव्याच्या बाबतीत, जेथे पत्नी किंवा अज्ञान मूल यांचा आयकर परताव्यात समावेश आहे, त्यांचे उत्पन्न सुद्धा वर नमूद केलेल्या मर्यादते असल्यास.

आयटीआर-१ सहज अर्ज लागू नसण्या-या व्यक्ती[संपादन]

खालील साधनांव्दारे उत्पन्न मिळणा-या व्यक्तींना आयटीआर-1 सहज अर्ज दाखल करण्याची आवश्यकता नाही.

 • एकापेक्षा जास्त मालमत्ता असल्यास
 • सोडत, घोडयांची शर्यत, कायदेशीर जुगार इ. मधून असल्यास
 • करमुक्त भांडवली फायदा असल्यास
 • शेतीमधून रु.५०००/- पेक्षा जास्त असल्यास
 • धंदा असल्यास

आयटीआर-१ सहज अर्जाचे सादरीकरण[संपादन]

अर्ज कोणत्याही आयकर कार्यालयामध्ये देता येतो. अर्ज दिल्यानंतर पोच पावती प्राप्त होते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अर्ज दाखल केल्यास दोन पर्याय आहेत. डिजिटल सही घेवून अर्ज ऑनलाईल दिसू शकतो किंवा अर्ज डाउनलोड करुन प्रिंट घेवून त्यावर स्वाक्षरी घेउुन प्रत माहितीसाठी बंगलोर येथील आयकर विभागाकडे टपालाने पाठवू शकतो.[४]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "आयकर परतावा दाखल सादर करण्याची अंतिम मुदत [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्लिश मजकूर). हिंदुस्तान टाईम्स. 2013-07-20 रोजी पाहिले.  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
 2. ^ "सहजच्या सूचना- आयकर परतावा". भारत सरकार, आयकर. 2013-07-20 रोजी पाहिले. 
 3. ^ "आयटीआर-1 सहज भारतीय वैयक्तिक आयकर परतावा(२०१२-१३)" (इंग्लिश मजकूर). मेक माय रिटर्न्स. 2012-09-06. 2013-07-20 रोजी पाहिले. 
 4. ^ "दाखल आयकर परतावा टिपा". डीयेने इंडिया. 2012-07-025. 2013-07-20 रोजी पाहिले.