आयएनएस विक्रांत (२०१३)
Jump to navigation
Jump to search
आयएनएस विक्रांत याच्याशी गल्लत करू नका.
आयएनएस विक्रांत तथा इंडिजिनस एरक्राफ्ट कॅरियर (आयएसी-१) ही भारतीय आरमाराचे नियोजित विमानवाहू नौका आहे. भारताता बांधलेली ही पहिली विमानवाहू नौका कोच्ची गोदीमध्ये बांधली जात आहे. या नौकेची बांधणी १९९९मध्ये सुरू झाली आणि डिसेंबर २०११मध्ये हिच्या सांगाड्याचे जलावतरण करण्यात आले. १२ ऑगस्ट, २०१३ रोजी याची बाहेरील बांधणी पूर्ण केली गेली. २०२१ साली या नौकेच्या चाचण्या सुरू होउन ही नौका भारतीय २०२३ साली आरमारात दाखल होण्याचा अंदाज आहे.
ही नौका बांधण्यासाठी १९३ अब्ज ४१ कोटी रुपयांचा (अंदाजे २.८ अब्ज अमेरिकन डॉलर) खर्च होणे अपेक्षित आहे.