आयएनएस निपात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

आयएनएस निपात (के८६) ही भारतीय आरमाराची विद्युत वर्गीय प्रक्षेपास्त्र नौका होती. ही नौका २६ एप्रिल, १९७१ रोजी आरमारात दाखल झाली व २९ फेब्रुवारी, १९८८ रोजी हिला निवृत्त करण्यात आले.

ऑपरेशन ट्रायडेंट[संपादन]

१९७१च्या भारत पाकिस्तान युद्धात निपातने मोठी भूमिका पार पाडली होती. ऑपरेशन ट्रायडेंट या कराची बंदराच्या वेढ्यात निपात शामिल होती. त्यावेळी पाकिस्तानी लढाऊ नौकांच्या तांड्याशी दोन हात करीत असताना निपातने दोन एसएस-एन-२ स्टिक्स प्रक्षेपास्त्रे पाकिस्तानकडे रसद व दारुगोळा घेून जाणाऱ्या एमव्ही व्हीनस चॅलेंजर या जहाजावर सोडले व तीस बुडविली. या कामगिरीसाठी निपातवरील लेफ्टनंट कमांडर (मुख्याधिकारी) यांना वीर चक्र देण्यात आले होते.