आम्रपाली आंबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दशहरी आणि निलम या आंब्यापासुन भारतीय कृषी अनुसंधान केंद्र दिल्ली येथे १९७१ साली आम्रपाली ही जात विकसित केली. हा आंबा खाण्यास दशेरी सारखाच अत्यंत गोड असतो. फळांचा आकार हा लांबट आणि जाडीला कमी असतो. या आंब्याला फळे दरवर्षी येतात.फळांमधे रेषा नसतात,हा आंबा साधारणपणे निलम या आंब्यासारखा जुनच्या पहिल्या आठवड्यापासून पिकायला सुरुवात होतो.